सातारा : श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिनाच्या भवदिव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा राजधानीत हजर होते. तेव्हा खा. उदयनराजे यांनी अजिंक्यतारा किल्याच्या सुशोभिकरणासह सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आग्रह धरला होता. यावेळी 'महाराजसाहेब आपल्या मागण्या पूर्ण करु' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे स्पष्ट केले होते. आज फडणवीस सकारने सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासंबधी जागेचा निर्णय घेऊन महाराजसाहेबांच्या शब्दाची कदर केली आहे, अशी भावना उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.
सुहास राजेशिर्के यांनी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, श्रीमंत छत्रपती खा. उदयरानजे भोसले यांनी सातारकरांना विकासाची कमिटमेंट दिलेली आहे. एकदा त्यांनी कमिटमेंट दिली तर ती पूर्ण होईपर्यंत ते थांबत नाहीत, हे सबंध सातारकरांना माहित आहे. महाराजसाहेबांच्या या 'कमिटमेंटची' चर्चा केवळ मुख्यमंत्र्यांपर्यतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत होत होती. खरंतर मुख्यमंत्र्यांनी वाढदिनाच्या सोहळ्याप्रसंगी 'मागण्या लवकरच पूर्ण करु' अशी कमिटमेंट देऊन एका अर्थाने वाढदिवसाची जणू महाराजांना भेटच दिली होती. कालच्या राजधानी महोत्सवाला मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. त्यामुळे श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या मागण्या पूर्ण होतील की नाही, याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. तथापि, महाराजसाहेबांच्या मागण्यांबाबत फडणवीस सरकार किती गंभीर आहे, हे आज दिसून आलेले आहे. कास धरण उंची प्रकल्प, ग्रेड सेपरेटर, भूयारी गटार यासारखे महत्वकांशी निर्णय घेऊन ते वेळेत पूर्णत्वास कसे नेता येतील यासाठी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले स्वतः प्रयत्नशील आहेत. केवळ सातारा राजधानीचाच नव्हे तर जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट करण्याचे स्वप्न खा. उदयन महाराजांचे आहे. ते स्वप्नही लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करत विकासाची घोडदौड करण्यासाठी तमाम सातारकर जिल्हावासीयांनी खा.उदयनराजे महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहनही उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |