06:48pm | Mar 27, 2018 |
सातारा : मटका व्यवसायाची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरुन रविवारी सायंकाळी आठ जणांनी एमआयडीसीतील कल्याण रिसॉर्ट मध्ये घुसून तोडफोड केली. तोडफोड करत असतानाच टोळक्याने हॉटेल मॅनेजर प्रकाश भोईटे यांना मारहाण केली असून याप्रकरणी अमर बनसोडेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मटका व्यवसायिकांनी राडा केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अजंठा चौकातील हॉटेल प्रीतीच्या पाठीमागे सुरु असणार्या मटका अड्यावर चार दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी छापा टाकून त्याठिकाणी असणार्या साहित्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी अमर बनसोडे, मनोज बनसोडेसह इतरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याठिकाणी सुरु असणार्या अड्याची माहिती कल्याण रिसॉर्ट मधून पोलिसांना देण्यात येत असल्याचा संशय बनसोडे व इतरांना होता. याच संशयावरुन रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अमर बनसोडे मनोज बनसोडे (रा. वनवासवाडी) हे इतर साथीदारांसमवेत कल्याण रिसॉर्टमध्ये गेले.
संशयितांनी हॉटेलच्या काउंटवर असणार्या प्रकाश भोईटे यांना उद्देशून शिविगाळ करत ङ्गतुम्ही आमच्या धंद्याची माहिती पोलिसांना देता, त्यामुळे कारवाई होते, आमच्या अड्या तोडला आहेफ, असे म्हणत तोडफोड करण्यास सुरुवात केली. तोडफोड करतानाच त्यांनी भोईटे यांना मारहाण सुध्दा केली. यावेळी त्याठिकाणी मयुर आनंदराव कणसे (रा. संभाजीनगर) हे आले व त्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संशयितांनी मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली असून मयुर कणसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |