सातारा : गोवा राज्यातून दारु घेवून अहमदनगरमध्ये विक्री करण्यासाठी स्कॉर्पिओमधून निघालेल्या एकाला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) अटक केली. संशयिताकडून गाडीसह विदेशी दारु बॉक्स असा एकूण 4 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राहूल रमेश खलाटे (वय 27, रा.खेड, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 रोजी सातारा महामार्गावरुन बेकायदा दारु वाहतुक होणार असल्याची माहिती पोनि विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. एलसीबीचे पोलिस महामार्गावर गस्त घालत असताना वाढे फाटा येथे एम एच 04 एफआर 1333 ही स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून कारमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये दारुचे बॉक्स होते.
पोलिसांनी त्यावरील चालक राहूल खलाटे याला दारु वाहतुक परवानाबाबत विचारणा केली असता तो निरुत्तर झाला. संबंधित दारु गोव्यातून आणून ती अहमदनगरमध्ये विक्री करण्यासाठी जात असल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून गाडी व दारु जप्त केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यता आली.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय शिर्के, सुधीर बनकर, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, विक्रम पिसाळ, विजय सावंत यांनी कारवाईत सहभा घेतला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |