03:07am | Aug 23, 2019 |
सातारा : कराड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने या विमानतळाच्या विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्रात शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आमच्या चळवळीची भूमिका सिद्ध झाली आहे. सद्यस्थितीला मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी विमानतळ विस्तारीकरणाचा जमिनीच्या भूसंपादनाची अंतिम प्रक्रियेला स्थगिती दिली असुन आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत विस्तारीकरण नक्कीच रद्द होईल अशी माहिती श्रमूदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटणकर म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असल्याचा आजचा २५ वा दिवस आहे. स्थानिक प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयात अद्याप कोणताही अहवाल पाठवला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घ्यावी लागली. त्यांना याबाबत सविस्तर माहिती देत जर मुख्यंमत्री यांच्याबरोबर बैठक लागल्यासच प्रश्नावर तोडगा निघेल असे सांगितले. जनतेने सहकारी पद्धतीने शेती बागायत करून अल्पभूधारक असूनहि कशी किमान समृद्ध कुटूंब उभी केली आहेत. हे दाखवून दिले. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्याचा अहवाल मागितला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्णायक बैठकीस अनुसरून भूसंपादनाच्या अंतिम प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले, विमानतळ विस्तारासाठी गेलेली ३ हजार २०० एकर जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, टेंभू प्रकल्प लिफ्ट या प्रकल्पात जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांना पुणे, मुंबईला नोकरीसाठी जावे लागत आहे. विमानतळ विस्तारवाढीस ९९ टक्के लोकांचा विरोध आहे. त्यामुळे हा विस्तारीकरणाचा घाट थांबवून खटाव तालुक्यातील निढळ-पुसेगाव येथे करावे. अशास्त्रीय आणि जनहिताच्या विरोधी धोरणे राबवण्याचे प्रयत्न यापूर्वीही जनतेने रोखले आहेत. या आंदोलनात सुद्धा असेच घडणार हे स्पष्ट आहे. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, पंजाबराव सपकाळ, चंद्रकांत पाटील आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |