कराड : कारची काच फोडून गाडीत ठेवलेल्या दोन लाख रुपयांवर डल्ला मारण्याचा चोरट्यांचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. हा प्रकार येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबतची माहिती अशी, सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेरे, ता. कराड येथील मारूती निकम हे गौण खनिज महसुलाचे दोन लाख रुपये भरण्यासाठी बँकेतून पैसे काढून त्यांच्या बलेनो कारमधून येथील तहसीलदार कार्यालयात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निकम यांनी कार तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यालगत पार्क केली होती. यावेळी त्यांना त्यांचे मित्र त्या ठिकाणी भेटल्याने निकम मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी नजीकच्या हॉटेलमध्ये गेले. दरम्यान, कारजवळ काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूचे लोक कारच्या दिशेने धावले. त्या ठिकाणी मोटर सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी गर्दीला पाहून तात्काळ घटनास्थळावरून पोबारा केला. संबंधित युवकांनी काच फोडून कारमधील काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेबद्दल बोलताना निकम म्हणाले, गौण खनिजचा महसूल जमा करण्यासाठी मी आताच बँकेतून दोन लाख रुपये काढून आलो आहे. हीच रक्कम पुढच्या शीटच्या डाव्या बाजूला असलेल्या डिग्गीत ठेवली होती. चोरट्यांनी याच दोन लाखावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटल्याचा आवाज आणि नागरिक सावध झाल्याने चोरटे पसार झाले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |