RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

फलटण पालिकेच्या अन्यायाविरोधात दिव्यांग दांम्पत्य स्वातंत्र्यदिनी करणार आत्मदहन

09 August 2018 at 19:36

सातारा : फलटण नगरपरिषदेच्या अपंग कोट्यातून पाच वर्षापासून येथील दिव्यांग दांम्पत्याला गाळा व जागा देत नसल्याने या दांम्पत्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. उपासमार होवून मरण्यापेक्षा येत्या स्वातंत्र्यदिनी फलटण नगरपालिकेसमोरच आत्मदहन करणार असल्याचा इशारा येथील दिव्यांग दांम्पत्याने दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, अर्जुन नामदेव मोहिते व त्यांच्या पत्नी संगिता अर्जुन मोहिते हे 100 टक्के दिव्यांग आहेत. दिव्यांगामुळे त्यांना इतर कोणतेही काम करता येत नाही. उपजिविकेसाठी 2013 सालापासून फलटण पालिकेकडे ते दिव्यांग कोट्यातून गाळा व जागेची मागणी करीत आहेत. मात्र फलटण पालिकेचे सत्ताधारी हे गुंडापुंडांना व धनदांडग्यांना अपंग कोट्यातील जागा देत आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षापासून आम्ही फलटण पालिका प्रशासनाला वारंवार पत्र्यव्यवहार करीत आहोत. तरीही पालिका प्रशासनाकडून आमच्या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. सध्या आमच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. उपासमार होवून मरण्यापेक्षा आम्ही दोघेही दि. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी फलटण पालिकेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग दांम्पत्य मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

Anil sursing mohite


चौंडेश्वरीनगर व मलकापूर येथील मस्जीदींचे अतिक्रमण हटवा

चौंडेश्वरीनगर गोवारे, व मलकापूर ,ता. कराड येथे सरकारी खुल्या जागेत मस्जीदीचे अनाधिकृतपणे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे.

5 hours before

मलटण मध्ये घरफोडी ; साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

4 hours before

बालकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकास सक्तमजुरी

शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्ग ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी पुणे येथील एका कार चालकाला खंडाळा न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

6 hours before

जमाव व शस्त्रबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खा. उदयनराजे, आ. शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे

सोमवारी भरदुपारी दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या टशन नंतर शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

6 hours before