सातारा : गोडोलीतील साईबाबा मंदीराचे साईरंग महाराज यांच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्याने त्यांचे शिष्य तसेच भक्त गजानन बाबूराव घाडगे (कारंजकर) (वय 65, रा.शुक्रवार पेठ) यांनी सोमवारी सकाळी राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने आत्महत्या केल्याच्या या घटनेने परिसरासह सातार्यात खळबळ उडाली असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सद्गुरु श्री साईबाबा मंदिर संस्था गोडोली, साताराचे संकल्पक, संस्थापक अध्यक्ष पांडुरंग शंकरराव भुजबळ उर्फ श्री साईरंग महाराज यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले आहे. शुक्रवार पेठेत राहणारे गजानन घाडगे हे त्यांना गुरु मानत होते. याशिवाय घाटगे यांचे राजवाडा येथे दुकान असून ते व्यापारी आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी ते परगावी गेले होते. परगावावरुन रविवारी सातार्यात आल्यानंतर साईनाथ भुजबळ यांचा मृत्यू झाला असल्याचे गजानन घाडगे यांना समजले. या घटनेने ते कमालीचे व्यथित झाले. गुरुचा मृत्यु झाल्याने त्यांनाही नेैराश्य आले.
रविवारी रात्री घरातील सर्व झोपी गेल्यानंतर सकाळी सर्व उठले. गजानन घाडगे यांच्या पत्नी किचनमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांना पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. कुटुंबियांना गळफास काढून तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवार पेठेतील गजानन घाडगे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात गर्दी उसळली. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घाडगे कुटुंबियांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर गजनान घाडगे यांची साईरंग महाराजावर नितांत श्रध्दा होती. साईरंग महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ते कमालीचे व्यथित झाले होते. त्या नैराश्यातूनच घाडगे यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांकडे तसा जबाब दिला आहे. गुरुच्या मृत्यूनंतर शिष्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा शाहूपुरी पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |