02:04am | Oct 15, 2019 |
कराड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यामातून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी बार असोसिएशनची मागणी पूर्ण करण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले हा प्रश्न भविष्यात राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवतील. आपण सर्वांनी मिळून अतुलबाबांना काम करण्याची एक संधी द्यावी, ते या संधीचे सोने करतील, असे आवाहन य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कराड बार असोसिएशनच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील, दीपक थोरात, ए.वाय.पाटील, एम.पी.देसाई, एस.टी.घाटे , भीमराव शिंदे, विशाल कुलकर्णी, महेश शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, माजी संचालक श्रीरंग देसाई यांची उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्हयांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ होणे आवश्यक आहे. लोकसंख्येचा विचार करता कोल्हापूर हे ठिकाण योग्य आहे. कराड बार असोसिएशनच्या इमारतीसह इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आग्रही असून ते सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.
नितीन पाटील म्हणाले, भोसले परिवाराने कराड तालुक्यामध्ये अनेक सहकारी संस्था निर्माण करून या भागात रोजगार उपलब्ध केला आहे. कृष्णा कुटूंबांचा रोजगाराचा प्रश्न खर्या अर्थाने आहे. बार असोसिएशनचे अनेक प्रश्न व्हावेत. सध्या जी इमारत शहरामध्ये आहे.त्यामध्ये गैरसोय होत आहे. त्या ठिकाणी बसण्यासह पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ निर्माण व्हावे, यासाठी अतलबाबांनी पुढाकार घ्यावा. आम्ही सरकारच्या माध्यमातून अतुलबाबा हा प्रलंबित प्रश्न सोडवतील असा विश्वास आहे. ऍड. ए.वाय. पाटील यांनी स्वागत केले. ऍड. भीमराव शिंदे यांनी आभार मानले. बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |