कराड : दोन महिन्यापूर्वी विरवडे ता. कराड येथे तमाशावेळी संशयीतांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या स्वप्निल शिरतोडे या युवकाच्या खूनाच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी चार संशयीतांना शुक्रवारी सायंकाळी शिताफीने अटक केली. अक्षय रामचंद्र चव्हाण, रोहित किसन आडके, रोहन भरत आडके (तिघेही रा. तुपारी, ता. पलूस) व सूरज गणेश कोरडे रा. ताकारी, ता. पलूस अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पाच संशयीतांवर गुन्हा नोंद झाला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अपघातात जखमी असल्याचे सांगून दोन महिन्यांपूर्वी बाबरमाची ता. कराड येथील स्वप्निल जयवंत शिरतोडे वय २१ या युवकास त्याचा गावातील मित्र विशाल विष्णू शिरतोडे रा. बाबरमाची याने येथील रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना दि. ३ मे रोजी रात्री स्वप्निलचा मृत्यू झाला. स्वप्निलला विरवडे गावच्या यात्रेनिमित्त १७ फेब्रुवारी २0१९ रोजी आयोजीत तमाशावेळी जबर मारहाण झाल्याने तो जखमी झाला होता. मात्र संशयीतांच्या भितीमुळे विशाल याने स्वप्निलला रूग्णालयात दाखल करताना तो दुचाकीवरून घसरून पडल्याने जखमी झाल्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, धाडस दाखवून विशाल याने अखेर घडलेला प्रकार स्वप्निलचे कुटूंबिय व पोलिसांना सांगितला. त्यामुळे पोलिसांनी विशाल याची फिर्याद नोंद करून स्वप्निलच्या खूनप्रकरणी अक्षय चव्हाण याच्यासह ताकारी, तुपारी येथील पाच संशयीतांवर गुन्हा नोंद केला होता.
या गुन्ह्यातील संशयीतांचा पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून कसून शोध घेण्यात येत होता. मात्र संशयीत पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी ताकारी, तुपारी येथे सापळा रचून या गुन्ह्यातील अक्षय चव्हाण, रोहित आडके, रोहन आडके (तिघे रा. तुपारी, ता. पलूस) व सूरज गणेश कोरडे (रा. ताकारी, ता. पलूस) या चार संशयीतांना शिताफीने ताब्यात घेवून अटक केली. याप्रकरणी अन्य एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडेही रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. या गुन्ह्याचा तपास सपोनि जोतिराम पाटील करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |