कराड : आ. बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून कराड अर्बन बॅंकेबाबत बदनामीकारक मजकूराचे बॅनर कराड आणि मलकापूर नगरपालिका हद्दीत उभे केल्याने बुधवारी सकाळी शहरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, आ. पाटील समर्थक मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यात जमा झाल्याने कराड आणि मलकापूरात उभे करण्यात आलेले बॅनर तातडीने काढण्यात आले. तसेच याप्रकरणी बॅनर उभे करणाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू होती.
कराड अर्बन बॅंक कर्ज घोटाळा, अशा मथळ्याखाली कराड आणि मलकापूर हद्दीत विविध ठिकाणी बुधवारी सकाळी बॅनर उभे करण्यात आले. त्या बॅनरवर मा. आ. श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील असा नामोल्लेख होता. यामुळे आ. समर्थकांनी त्या बॅनरचे मोबाईलवर फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकल्याने बॅनरची वार्ता संपूर्ण शहरात पसरली. तसेच आमदार समर्थक गोळा होऊ लागले. कराड अर्बन बॅंकेचे अधिकारी आणि विद्यमान नगरसेवक अतुल शिंदे यांनीही नगरपालिकेत जाऊन बॅनरच्या परवानगीबाबत माहिती घेतली असता बॅनरसाठी परवानगी दिली नसल्याचे समजले.
त्यामुळे शिंदे यांनी तातडीने ते फलक काढण्याची सूचना पालिका कर्मचाऱ्यांना केली. पालिका कर्मचाऱ्यांनी ते फलक काढून ताब्यात घेतले. बॅनरमुळे वातावरण तापल्याने पोलीसही सतर्क झाले होते.
दरम्यान, आमदार समर्थकांनी शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. आमदार पाटील यांचे बंधू आणि माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, जयंत पाटील, पुतणे आणि विद्यमान नगरसेवक सौरभ पाटील हेही पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसेच विनापरवाना आणि बदनामीकारक बॅनर उभे करून शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कराड, मलकापूर नगरपालिकेने बॅनर उभे करणाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आ. पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केल्याप्रकरणी सौरभ पाटील यांनी अशोक पाटील (रा. काले) व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |