कराड : राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या जनसंघर्ष यात्रेचे कराडला मोठ्या दिमाखात स्वागत झाले. सांगली जिल्ह्यातील कडेगावहून आलेल्या यात्रेचे ओगलेवाडी येथे आगमन झाले. रात्री आठनंतर ती यात्रा कर्हाड शहरात दाखल झाली. कृष्णा नाक्यावर त्याचे शानदार स्वागत झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चारुलता टोकस, आमदार आनंदराव पाटील, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश होता.
काँग्रेसची जनसंघर्ष येणार असल्याने आज सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते येथे टाऊन हॉलमध्ये येत होते. सायंकाळी सहानंतर त्यांची संख्या वाढली. संघर्ष यात्रा रात्री आठनंतर प्रत्यक्ष कर्हाडात दाखल झाली. कृष्णा नाक्यावर त्याचे जंगी स्वागत झाले. झांजपथक आणण्यात आले होते. नाक्यावरून दुकाची रॅली काढण्यात आली. प्रत्यक्ष टाऊन हॉलमध्ये झांजपथकाचा गजर झाला. त्यानंतर सर्वजण जाहीर सभेच्या स्थळी आले.
कोल्हापूर येथून काल जनसंघर्ष यात्रेस प्रारंभ झाला आहे. ती यात्रा आज येथे आली. सातारा जिल्हा कॉग्रेस व प्रदेश काँग्रेस समितीतर्फे घेतलेल्या जनसंघर्ष यात्रेचे येथे दिमाखात आगमान झाले. ओगलेवाडी येथे यात्रेचे स्वागत होवून त्यातील जाहीर सबा येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात उशिरापर्यंत सुरू होती. ओगलेवाडी येथून निघालेली जनसंघर्ष यात्रा कृष्णा नाका येथून यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे आली. मिरवणूकीने यात्रेचे आगमन झाले. तेथे रात्री उशिरा जाहीर सभा सुरू होती. उद्या (सोमवारी) सकाळी साडे आठला जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस अभिवादन केले जाणार आहे. आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थीत राहणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |