महाबळेश्वर : तालुक्यात आज दि. १८ रोजी एकाच दिवशी दोन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत एका अकरा वर्षीय अल्पयीन शाळकरी मुलीची छेड काढल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली असून या तक्रारीवरून पोलीसांनी गौरव राजु ढेबे (वय 22) रा. महाबळेश्वर यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महीलेचा त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका स्वयंपाक्याने विनयभंग केल्या प्रकरणी स्वयंपाकी संतोष दशरथ रांजणे याचेवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबबत सविस्तर माहिती अशी की, येथील एका सोसायटीमध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणी सोबत शाळेत जात असताना त्याच सोसायटी मधील गौरव ढेबे याने त्या मुलींशी लज्जा उत्पन्न होईल असे बोलून, खुप सुंदर दिसतेस, तु मला आवडतेस , तुला मी आवडतो का ? हे आत्ताच सांग असा आग्रह धरून, उदया तु मला इथेच याच वेळी भेट असे म्हणाला या अनपेक्षित प्रकाराने मुली घाबरल्या त्यांनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालिकांनी मुलीला घेवुन थेट पोलिस ठाणे गाठले व सबंधित युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपी गौरव ढेबे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कुंभरोशी ता. महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये चपाती लाटण्याचे काम करणारी महीलेचा त्याच हॉटेल मधील स्वयंपाकी संतोष दशरथ रांजणे (वय 38) याने महीला चपात्या लाटत असताना तिच्या पाठीवरून हात फिरवुन तु मला आवडतेस तुझा फोन नंबर मला दे असे म्हणत महीलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत संबंधित पिडीत महीलेने आज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच महाबळेश्वर पोलिसांनी संतोष रांजणे याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
या दोन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शना खाली पो.उपनिरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |