03:21am | Dec 04, 2019 |
कराड : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या संतोष लकेसर या सभासदाने प्रतिएकरी 133 टन इतके उच्चांकी ऊस उत्पादन घेत कृष्णा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्यांचे उत्पादन वाढावे यासाठी जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून प्रतिएकरी 100 टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. गेल्या तीन वर्षात या योजनेत 7 हजार 255 शेतकरी सभासद सहभागी झाले असून, 335 शेतकर्यांनी प्रतिएकरी 100 टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेतले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकर्यांच्या ऊसपिकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे, ऊस विकास विभागातील सर्कल ऑफिसर व शेती मदतनीस यांच्यामार्फत मार्गदर्शन व माहिती संकलित केली जाते. तसेच सहभागी शेतकर्यांना कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येतात. या योजनेत सहभागी झालेले दुधारी (ता. वाळवा) येथील शेतकरी सभासद संतोष पिराजी लकेसर यांनी उत्कृष्ट नियोजनाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. त्यांच्या 42 गुंठे क्षेत्रातील कारखान्याकडे गळितास आलेल्या उसाचे उत्पादन 140.305 मेट्रीक टन म्हणजेच प्रतिएकरी 133.620 मेट्रीक टन इतके आहे. या शेतकर्याच्या शेतीची पाहणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक आनंदराव लकेसर, नंदकुमार पाटील, विश्वास पाटील, रंगराव पाटील, अरूण यादव, जयवंत कदम, अधिक जाधव, अमोल लकेसर, पांडूरंग निकम, शामराव कदम, किशोर पाटील, माणिक निकम, धनाजी मोरे, मुख्यशेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, यांच्यासह ऊस विकास व शेतकी विभागातील कर्मचारी व प्रगतीशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |