दहिवडी : माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसी सामना करण्यासाठी राष्ट्रवादी तर्फे दुष्काळी जनतेला मदतीचा हातभार लागावा यासाठी दुष्काळ निवारणासाठी स्वत:च्या खासदार फंडातून दीड कोटी रूपये पाणी चारा या साठी खर्च करण्यासाठी देण्याचा निर्णय या दुष्काळी पहाणी दौर्यात केंद्राचे माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी शिंदी खुर्द येथे जाहिर केला.
राष्ट्रवादी फंडातुन देण्यात येणारी हि दुष्काळी मदत घेतला कोठे किती खर्च करायचे याची जबाबदार राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली. आहे सध्याचे सरकार दुष्काळाची जबाबदारी झटकत आसल्याने मे संपत आला तरी जनावराच्या छावण्या त्याला चार त्याच प्रमाणे पाणी पुरवठ्याचे नियोजन न केल्याने माण खटावसह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत गंभीर झाल्याचा आरोप पवार यानी केला. या दुष्काळी दौर्याची सुरवात बिजवडी येथून बिजवडी येथील नागरीकांसी दुष्काळी अडचणी समजुन घेत त्यावर उपाययोजना कशा प्रकारे करावी लागेल याची थेट संवाद साधला त्यानंतर शिंदी खुर्द येथील दुष्काळी परिस्थिती व वाँटर कपची सुरु असलेली कामे व छावणीची पहाणी करुन छावणीतील शेतकर्यांसी संवाद सादला तेथून वावरहिरे येथे रोजगार हमीतुन सुरु असलेल्या कामावर जावून मजुरासी चर्चा करुन मजुरी किती व वेळेवर पगार मिळतो का सध्याच्या परिस्थितीत हि मजुरी तोकडी पडत असल्ययाचे मजुरांनी सांगीतले वावरहिरे येथून मार्डी छावणीस भेट देवू भालवडी येथील छावणीस भेट दिली तेथून स्व. माजी आ. सदाशिवराव पोळ यांच्या निवासस्थानी जावून तात्याच्या पत्नी श्रीमती सुमन सदाशिवराव पोळ यांच्या तब्बेतीची चौकसी करुन जेवन व विश्रांती घेवून पुन्हा पालवण येथे सुरु असलेले श्रमदानाच्या कामाची पहाणी करुन समाधान व्यक्त करत एकीच्या जोरावर पानवणकर येणार्या काळात नक्कीच टँकर मुक्तीकडे जाईल अशी आशा बाळगली शेतकर्यांसी संवाद सादुन पवार साहेब म्हसवड येथे बारामती अँग्रो फाऊंडेशनचे अध्यक्ष व पूणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार यांच्या वतीने माण तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पंन्नास टँकरसाठी येणारा पूर्ण खर्च करण्याचे जाहिर करुन यावेळी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते फित कापुन टँकरला झेंडा दाखवण्यात येवून पाणी टंचाई भागात टँकर पाठवण्यात आले.
दरम्यान माढा मतदार संघातील विजयासंदर्भात भाष्य करताना शरद पवार म्हणाले, आणखी 12 दिवसांनी संजयमामा शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण 12 दिवसांनी संजयमामा आमच्यासोबत दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा खुलासा पवार यांनी करत तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. त्यावर सर्वांनी हो...म्हणून उत्तर दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व लोकसभेचे उमेदवार संजयमामा शिंदे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा कविता म्हेत्रे, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवराज सुर्यवंशी, रमेश पाटोळे, संदीप मांडवे, प्रविण इंगवले, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव नामदेव भोसले, शिवाजीराव सर्वगोड, पृथ्वीराज राजेमाने बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |