कराड : समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर याठिकाणी संविधान दिन व यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अशोकराव थोरात भाऊ यांनी वरील उद्गार काढले.संविधानाची माहिती सर्वांना व्हावी याच हेतूने हा उपक्रम वाचनालयामध्ये घेतला असल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले नीतिमत्ता, प्रामाणिकपणा अंगी बाणण्यासाठी देशाची राज्यघटना सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. म्हणून भारत देशाच्या राज्यघटनेचे परायण झाले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राज्यघटनेचे माहिती वारंवार सांगावी. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला राज्यघटना समजेल व देशात शांतता नांदेल. प्रत्येक नागरिकाला असणारे हक्क व कर्तव्य समजतील यासाठी देशात प्रत्येकजण घटना साक्षर होणे गरजेचे आहे.
संविधान दिनाचे प्रमुख पाहुणे मा.श्री विश्वास सुतार..(नामवंत लेखक) यांनी संविधानावर सविस्तर माहिती सांगितली ते म्हणाले 1915 ते 1947 या कालावधीत क्रांती घडवून आणणारे महात्मा गांधी तसेच संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती सांगितली भारतीय संविधान हा जीवन ग्रंथ झाला पाहिजे. सर्वधर्मसमभाव असणार्या भारताने भारतीय संविधानाला आपला प्रमुख ग्रंथ मानून ते समजून घेतले पाहिजे 1773 साली भारतीय संविधानाची बीजे रोवली गेली आहेत व 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने संविधान स्वीकारले. या संविधानाने प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत. कर्तव्ये दिली आहेत.त्याचे पारायण करून प्रत्येक भारतीयाने आपले वर्तन ठेवले पाहिजे.समाजातील प्रत्येकाकडे टॅलेंट, टेक्नॉलॉजी व ट्रस्ट यांची गरज आहे. असा प्रत्येकाचा विचार असावा त्यात राष्ट्र हित साधले गेले पाहिजे. कृती अशी करावी की त्यात सर्वांचे हित साधले गेले पाहिजे. याच साठी संविधानाचे आचरण करावे.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वास सुतार , अशोकराव थोरात इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. प्रा.सौ.शीला पाटील यांनी ग्रंथालयाच्या चढत्या आलेखात बाबत माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ सुरेखा खंडागळे यांनी केले सर्व उपस्थित शिक्षक मान्यवर वाचक ग्रंथप्रेमी ग्रामस्थांचे आभार श्री सुधाकर शिंदे याने मानले.
कार्यक्रमास विलासराव पाटील ,एस.टी. सुकरे, डीपी कांबळे शिवाजीराव जाधव प्रशांत गावडे सारिका गावडे अण्णासो काशीद भरत जंत्रे तसेच श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक ,समाज प्रबोधन वाचनालयाचे सर्व संचालक,ग्रंथपाल सौ.स्वाती घाटगे, बापूराव चव्हाण उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |