03:22am | Apr 08, 2019 |
कराड : सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शनिवारी दिवसभर कराड शहरातील आजी माजी नगरसेवकांच्यासह, व्यापारी, नागरिकांशी संवाद साधला. गेल्या दहा वर्षांत कराड शहरात खासदार निधीमधून होउ शकणारी कामे ठप्प झाली असल्यामुळे ती मार्गी लावण्यासाठी महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर स्थापन करण्यात आलेल्या कराड शहर माजी नगरसेवक विकास मंचच्या सदस्यांचीही विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानगुडे-पाटील, विठ्ठल रुक्मिणी समितीचे ट्रस्टचे अध्यक्ष, भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, कराड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, कराड तालुकाप्रमुख शशिकांत हापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांनी उर्वरीत लोकसभा मतदारसंघाबरोबरच कराडकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या कराडमध्ये खासदार विकास निधीतून एकही भरीव विकासकाम करण्यात आलेले नाही. अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीस घरी बसवण्याची संधी आता मतदारांच्याकडे आली आहे. आता सातार्याला जनसामान्यांचे प्रश्न समजणारा आणि तो सोडवण्याची धमक असणारा खासदार हवा आहे. सातार्यापुढे असंख्य समस्या आ वासून पुढे उभ्या असताना विद्यमान खासदार राज्य आणि केंद्र सरकारवर अनावश्यक टीका करुन जनतेची दिशाभूल करत आहेत. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात कोणती विकासकामे केली आणि पुढील पाच वर्षांत कोणती करणार याबाबत त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली.
यावेळी नरेंद्र पाटील यांनी माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, माजी डीवायएसपी अशोक शिंदे, संजय शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या घरी भेट देउन त्यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांनी कराड शहर माजी नगरसेवक विकास मंचचे माधवराव पवार, अशोक पाटील, प्रदीप जाधव, भीमराव सुर्यवंशी, शब्बीर शेख, बाळासाहेब भुतकर, हरिभाऊ जोशी, दीपक पेंढारकर, राजाभाऊ देशपांडे, प्रमोद वेर्णेकर, संभाजी सुर्वे, मजहर कागदी, शांताराम थोरवडे अशोक भोसल,े बाळासाहेब उमराणी, कमलाकर कांबळे, इसाक सवार, अमृत देशपांडे प्रकाश जाधव, महादेव पवार, शिरीष पेंढारकर, विजय मुठेकर, विलास कुंभार यांच्याशीही चर्चा केली. माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, शिक्षण मंडळचे मुकुंद कुलकर्णी, शहर भाजप उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, दत्तात्रय कलबुर्गी, किशोर ढवळे, किशोर शिंदे यांची भेट घेउन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शहरातील आंबेडकर पुतळा, शिंदे गल्ली, गणपती मंदीर, बाजार समिती, बैलबाजार रोड आदी ठिकाणी भेट देउन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |