01:59pm | Jul 23, 2020 |
सातारा : राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना ‘जय भवानी, जय शिवराय’, अशी उद्घोषणा केल्यानंतर उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी खा. उदयनराजेंना उद्घोषणा न देण्याचे समज दिली होती. यानंतर महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला आहे. विशेषत: सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर खा. श्री.छ. उदयनराजे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन करुन छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असता तर त्याचक्षणी राजीनामा दिला असता, असे कडाडून काल घडलेल्या शपथनाट्याला पूर्णविराम दिला.
देशातील राज्यसभा खासदारांचा काल राज्यसभेच्या सभागृहात शपथविधी पार पडला. या शपथविधीला महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले खा. शरद पवार, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, राजीव सातव, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी यांचा शपथविधी पार पडला. यावेळी उदयनराजेंनी आपल्या पद व गोपनीयतेची इंग्रजीमधून शपथ घेतली. शपथ संपल्यानंतर त्यांनी ‘जय भवानी, जय शिवराय’ अशी उद्घोषणा केली. यानंतर या उद्घोषणेवर कॉंग्रेसच्या गुलाम नबी आझाद व दिग्विजय सिंग यांनी आक्षेप घेतला. यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी माझ्या दालनात अशा उद्घोषणा चालणार नाहीत, असे म्हणत खा. उदयनराजेंना समज दिली. यानंतर जय भवानी, जय शिवराय या उद्घोषणेला चक्क राज्यसभा सभापतींनीच आक्षेप घेतल्याने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. छत्रपती शिवराय व महाराष्ट्रापेक्षा व्यंकैय्या नायडू मोठे आहेत काय? महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली जाईल, अशा शेलक्या भाषेतील प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने उडी घेत हा विषय तापवण्याचा प्रयत्न केला. शपथविधी प्रकरण गाजत असतानाच आज दुपारी खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन आपली सविस्तर भूमिका मांडली. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडूंचे वर्तन चुकीचे नाही. त्यामुळे या प्रकरणाला फारसे महत्त्व द्यायला नको’’ असे वक्तव्य करुन शपथविधीनंतर पडलेल्या वादाच्या ठिणगीला शमवण्याचे काम केले आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर राज्यभरात काय प्रतिक्रिया उमटताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही...
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2020
जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!
Press Conference at New Delhi.https://t.co/fChXFQPetR pic.twitter.com/y8kmccHGXH
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 23, 2020
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |