पाटण : सध्या, देशाची मोठी अधोगती चालली आहे. याला फक्त काँग्रेसचा विचारच रोखू शकेल. यासाठी सर्वांनी एकदिलाने संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील श्रीराम पतसंस्थेच्या (कै.) भाऊ मोकाशी सभागृहात आयोजित नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा सरचिटणीस नरेंद्र देसाई, अॅड. राजन भिसे, अरविंद घाडगे, एल. एम. पवार, इंद्रजित चव्हाण, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आचरे, अभिजित पाटील, तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. तालुक्यात असलेल्या गटा -तटाच्या राजकारणातून तालुक्याला बाहेर काढायचे असून आत्मविश्वासाने पक्षाला उभारी देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा.
जिल्हा सरचिणीस देसाई म्हणाले, कोयनानगर वसाहतीत उभारलेल्या निवारा शेडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तालुक्यातील आजी-माजी मंत्री प्रस्थापित असून निवारा शेडला वीज आणि पाणी नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, अशी कैफियत यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांच्यासमोर मांडली. तसेच याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
धनश्री महाडिक, मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विलास सपकाळ यांनी स्वागत केले. तर तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव यांनी आभार मानले.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |