सातारा: खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी उद्घाटन केलेल्या सातार्यातील ग्रेड सेपरेटरचे शासकिय उद्घाटनही लवकरच होणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच तारीख ठरविली जाणार असून पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटरचे शासकिय उद्घाटन होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचे दुसर्यांदा उद्घाटन झालेले सातारकरांना पहायला मिळणार आहे. दरम्यान, आता याबाबत उदयनराजे भोसले काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सातारा शहरातील पोवई नाका येथे आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लावण्यासाठी खा.उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरची योजना आखली. त्यानुसार 75 कोटी रूपये खर्चून या ग्रेड सेपरेटरचे काम झाले. त्यानंतर याचे उद्घाटन कधी होणार? याची उत्सूक्ता सातारकरांना लागली होती.
दरम्यान, खा.श्री.छ.उदयनराजे भोसले चार दिवसापूर्वी पहाणी करण्यासाठी आले. त्यांनी थेट उद्घाटनच करून टाकले. सध्या हा ग्रेड सेपरेटर नागरीकांसाठी खुला झाला असला तरी त्याचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अदयाप बांधकाम विभागाने दिलेला नाही. तसेच तो देखभाल दुरूस्तीसाठी कोणाकडे हस्तांतरीत होणार हेही ठरलेले नाही. त्यामुळे शासकीय कार्यवाही होणार का? हा प्रश्न होता. आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्घाटन होणार आहे. त्यासाठी आम्ही बांधकाम विभागावर जबाबदारी सोपविली आहे. तसेच सध्या ग्रेड सेपरेटर नागरीकांसाठी खुला असल्याने यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, त्याची माहिती घेऊन त्याची सुधारणा ही केली जाणार आहे. तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिस विभागाकडून संपूर्ण शहरातच येत्या दीड महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवास करणार्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षिततेची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |