11:21pm | Aug 03, 2021 |
फलटण : कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल फलटणच्या सुकन्या आणि सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोविड संजीवनी पुरस्कार राजभवनात देण्यात आला.
महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून कोविड संजीवनी पुरस्कार हा कोविड मध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याला दिला जात आहे. हा पुरस्कार देताना अधिकाऱ्यांनी राबवलेल्या उपायोजना त्याचा झालेला परिणाम याचा बारीक अभ्यास केला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार मूळच्या फलटणच्या आणि सध्या मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त हा पदभार असलेल्या सुजाता दिलीपराव ढोले यांना देण्यात आला. मार्च 2020 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका मध्ये अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. नंतर कोरोनाने धुमाकूळ घातला असताना कोरोनाचे आव्हान स्वीकारून त्यांनी काम सुरू केले. नवी मुंबईच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता संसर्ग रोखणे खूप अवघड होऊन बसलेले असतानाच सुजाता ढोले यांनी अनेक नवीन उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अविरत काम करत एकही दिवस सुट्टी न घेता नवी मुंबईतील मृत्यूदर कमालीचा नियंत्रित राखल्याबद्दल शासनाने त्यांचा यथोचित गौरव करत हा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार त्यांना प्रदान केला.
यावेळी बोलताना सुजाता ढोले म्हणाल्या, टेस्टिंग ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीच्या आधारावर नवी मुंबईतील कोरोना आटोक्यात ठेवला. देशातील महापालिकेच्या स्वतःच्या मालकीची व सर्वात कमी कालावधी मध्ये आम्ही पहिली टेस्टिंग लॅब बनवली. तसेच पहिल्या लाटेमध्ये जवळपास दोन लाख मजुरांना रोज महापालिकेतर्फे जेवण दिले गेले.अपंगांना घरपोच किराणा पोहोचवण्याचे काम विविध एनजीओ च्या मार्फत महापालिकेने केले. दोन्ही लाटेमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, पुरेसा औषध साठा तयार ठेवणे, ऑक्सिजनची उपलब्धता करून देणे, आयसोलेशन सेंटर व कोविड सेंटरची वेळोवेळी व्यवस्था ठेवणे या सर्व गोष्टी खरोखरच तारेवरच्या कसरती प्रमाणे होत्या. परंतु आमचे आयुक्त आणि सर्व कर्मचाऱ्यांची टीम यांनी एकदिलाने काम करत कोरोना वरती यशस्वी मात केली, याचा सन्मान म्हणून आज मला राज्यपालांकडून हा पुरस्कार मिळत असल्याने आनंद झाला असे सुजाता ढोले यांनी सांगितले. सुजाता ढोले यांचे पती दिलीपराव ढोले हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. या पुरस्काराबद्दल सुजाता ढोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |