08:09pm | Apr 26, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात 18 लाख 50 हजार मतदार असून अठरा वर्षे पूर्ण करणारे 50 हजार नवतरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दहा जणांचे एक पथक मतदार संघ निहाय लोकांच्या घरोघरी जाऊन मतदानासाठी आवाहन करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्ह्याचे खर्च निरीक्षक उदयकुमार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.
डुडी पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यातील 243 मतदान केंद्रांवर 50% पेक्षा कमी मतदानाची नोंद गत पंचवार्षिकला झाली होती. उन्हाचा वाढता तडाखा तसेच मतदानाची कमी टक्केवारी याकरता मतदान कसे वाढेल, याकरिता जिल्हा प्रशासन सक्रिय आहे. तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका तसेच महसूल कर्मचार्यांचे एक पथक मतदार संघ निहाय पन्नास घरांना भेटी देऊन मतदान करा, यासाठी आवाहन करणार आहे. सातारा जिल्ह्यात 18 लाख 50 हजार मतदार संख्या असून जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे 18 वर्षे पूर्ण केलेल्या 50 हजार नवमतदारांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 2 मे रोजी महाविद्यालयनिहाय प्राचार्य आणि नव मतदारांची बैठक घेऊन मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी कार्यशाळा आणि जनजागृती चे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय शासकीय मतदार साडेआठ हजार असून त्यांना कर्तव्य सेवेत असताना मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग तसेच अंधबांधव यांच्यासाठी घरातून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवार नामनिर्देशित झाले असून सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये त्यांच्या खर्चाचा तपशील नोंदवण्याचे काम सुरू आहे. याकरता आयआरएफएस विभागाचे निर्देशक उदयकुमार यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांचे काम सुरू झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान मतदान करावयाचे आहे. उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मंडप उभारणी, रुग्णवाहिका, पंखे उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी ओआरएस पावडर तसेच काही सरबतांची सोय केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार कर्मचार्यांचे दोन टप्प्यात प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाले असून काही कर्मचार्यांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. याशिवाय सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. सातारा जिल्ह्याची संस्कृती आणि परंपरा दर्शवणार्या काही घटना व प्रसंग याचे जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रांवर चित्र देखावा उभा केला जाणार आहे. कोणत्या मतदान केंद्रांवर हे करण्यात येणार आहे याची यादी दोन मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने एक लाख तीस हजार रुपयांची विदेशी दारू, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे. जिल्ह्यात सहा भरारी पथके तैनात असून जिल्ह्याच्या हद्दीवरील वेगवेगळ्या चेक नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोयना धरण वगळून जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमध्ये चार टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून माण, खटाव, सांगली चा काही भाग येथे पाणी पुरेल असे नियोजन केले होते. जलसिंचन विभागाकडून मार्चमध्येच माण-खटाव तालुक्यातील तलावांची माहिती व त्याला लागणारे उपलब्ध पाणी याचा आराखडा तयार करून ते तलाव भरून घेण्यात आले होते. जिहे-कटापूर, तारळी या दोन धरणांचे काम पूर्ण झाल्यामुळे पाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्या पाण्याचा उपयोग करून जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाई जाणवणार नाही यासाठी उपाय योजना सुरू आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात टँकरची संख्या वाढलेली नाही.
सातारा जिल्ह्यात चार लाख टन चारा तयार झाला असून आवश्यक ठिकाणी गावांमध्ये चारा छावण्या उभारण्याच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. शेतकर्यांना मुरघास उत्पादन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शेतकर्यांनी कृषी विभागाशी पेरणी यंदाच्या संदर्भात समन्वय ठेवावा म्हणजे आगामी खरीप हंगामाचे त्यांचे नुकसान होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |