रशिया : रशियाने युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. पूर्व युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात ३० हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. युक्रेनमधील नागरिकांचे देशाच्या सुरक्षित भागांमध्ये स्थलांतर सुरु असताना हा हल्ला झाला असल्याचे रेल्वे कंपनीने सांगितले.
रशियन रॉकेट क्रॅमाटोर्स्क शहरातील एका रेल्वे स्टेशनवर धडकले. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. ज्या रेल्वे स्टेशनवर हा हल्ला झाला आहे, त्याचा उपयोग नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी केला जात होता.
“रशियाने डागलेली दोन रॉकेट्स क्रॅमाटोर्स्क रेल्वे स्टेशनवर आदळली. ऑपरेशनल डेटानुसार, क्रॅमाटोर्स्क रेल्वे स्टेशनवरील रॉकेट हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १०० हून अधिक जखमी झाले आहेत,” असे युक्रेनियन रेल्वेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवरील हल्ल्याच्या वृत्तावर रशियाने अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. युक्रेनमधील नागरिकांवर हल्ला केला जात नसल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे.
डोनेस्तक प्रदेशाचे गव्हर्नर पावलो किरिलेन्को यांनी सांगितले की, रशियाने जेव्हा रॉकेट हल्ला केला तेव्हा हजारो लोकांची स्टेशनवर गर्दी होती. रशियाला दहशत आणि भीती निर्माण करायची आहे, त्यांचा एकावेळी अधिक लोकांना लक्ष्य करायचे उद्देश आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
किरिलेन्को यांनी एक फोटो ट्विट केला असून त्यात सूटकेस आणि इतर सामानांजवळ जमिनीवर अनेक मृतदेहांचा खच पडला आहे. तेथे फ्लॅक जॅकेट घातलेले सशस्त्र दलाचे पोलीस तैनात आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |