चंदीगड : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमम याला रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. १२ ऑक्टोबर रोजी गुरमीर राम रहीम याच्या शिक्षेचा निर्णय जाहीर करण्यात येईल.
न्यायालयाने या प्रकरणात राम रहीमसहीत इतर चार जणांना दोषी ठरवले. कृष्ण लाल, सबदिल, अवतार, जसबीर अशी या चार दोषींची नावे आहेत. तर याच प्रकरणातील आणखी एक आरोप इंदरसेन याचा अगोदरच मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी सुनावणीसाठी गुरमीर राम रहीम आणि कृष्ण लाल याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर आरोपी अवतार, सबदिल आणि जसबीर यांना प्रत्यक्षरुपात न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
गुरमीत सध्या सुनारिया तुरुंगात
या अगोदर, एका साध्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला २५ ऑगस्ट २०१७ रोजी दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात गुरमीत सध्या सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.
रणजीत सिंह हत्या प्रकरण
१० जुलै २००२ मध्ये डेरा व्यवस्थापन समितीचा सदस्य राहिलेल्या कुरुक्षेत्राच्या रणजीत सिंह याची हत्या करण्यात आली होती. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात समोर आलेल निनावी पत्र रणजीत सिंह यानी बहिणीकडून लिहून घेतल्याचा संशय गुरमीत राम रहीम आणि इतर आरोपींना होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. रणजीत सिंह हत्या प्रकरणात पोलिस चौकशीवर नाखुश असलेल्या रणजीत याच्या वडिलांनी जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सीबीआयनं तपास आपल्या हाती घेऊन २००७ मध्ये कोर्टासमोर चार आरोपींवर आरोप निश्चित केले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |