12:16pm | Jun 04, 2020 |
वॉशिंग्टन: अमेरिकेत कृष्णवर्णीयाच्या हत्येनंतर नवव्या दिवशी प्रचंड तणाव असून 40 शहरांत संचारबंदी लागू आहे. अमेरिकेत एका तुरुंगात पोलिसाने केलेल्या कृष्णवर्णीयाच्या हत्येनंतर उसळलेले आंदोलन अधिकच भडकले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी हिनेही या आंदोलनाचे समर्थन केले आहे. इन्स्टाग्रामवर वांशिक भेद आणि पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध सुरू झालेल्या मोहिमेत ती सहभागी झाली.
संचारबंदी लागू असतानाही अनेक शहरांत रात्री संतप्त लोक रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. अनेक शहरांत लष्कराचे जवान तैनात असूनही न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तेथे रात्रीस संचारबंदीदरम्यान हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सलग पाचव्या दिवशी रात्री दंगल व लुटालूट सुरूच आहे. पेंटागॉनच्या हवाल्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजधानीच्या शहरात म्हणजे वॉशिंग्टनमध्येही लष्कराचे 1600 जवान तैनात ठेवावे लागले. तेथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, माझ्या सरकारने माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकननंतर कृष्णवर्णीयांसाठी अधिक चांगले काम केले असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. कृष्णवर्णीयांच्या महाविद्यालयांसाठी निधीची हमी दिली. गुन्हेगारी न्याय सुधारणा केली. देशात कृष्णवर्णीयांतील बेरोजगारी, गरिबी व गुन्हेगारी दर सर्वात कमी आहे. डेमोक्रॅट्स नेते व माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या 40 वर्षांत कृष्णवर्णीयांसाठी काहीही तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप केला. देशात सुरू असलेल्या हिंसाचारात आजवर 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. सुमारे 13 पोलिस कर्मचारी व अधिकारी मृत्युमुखी पडले.
दरम्यान, अमेरिकेत उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेत सर्वत्र जनक्षोभ उफाळून आला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. फ्लॉयडच्या मृत्यूनंतर लोकांनी ट्रम्प सरकारला धारेवर धरले. आता तेथील सामाजिक परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
फ्लॉइडला पाठिंबा देणारे खेळाडू कौतुकास पात्र
फ्लॉइडचा मृत्यू व पोलिसांचे कृष्णवर्णीयांसोबत होत असलेले अमानुष वर्तन याविरोधात जर्मनीच्या बुंदेसलीगाच्या फुटबॉलपटूंनी दंड थोपटले आहेत. फुटबॉलपटू जेडन सांचो यांनी गोल केल्यानंतर जर्सी काढली तेव्हा त्याच्या टी शर्टवर हाताने लिहिले होते की, जस्टिस फॉर जॉर्ज फ्लॉइड इन्फेटिनो यांनी म्हटले, नुकत्याच झालेल्या सामन्यात खेळाडच्या निदर्शनांचे फिफाकडून कौतुक करण्यात येईल.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |