01:15pm | Jul 31, 2020 |
नवी दिल्लीः कुरापखोर चीनला धडा शिकवण्याची मालिका भारताने सुरूच ठेवली आहे. भारतीय बाजारपेठेवर अवलंबून असणार्या चीनला भारताने अजून एक झटका दिला आहे. चिनी कलर टीव्हीच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं आणि इतर देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीला प्रोत्साहन देणं हे या मागचे उद्दीष्ट आहे. डीजीएफटीने यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. आता मुक्त आयात करता येणार नाही. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
भारताच्या या निर्णयाने चीनला मोठा झटका बसणार असलयाचे निश्चित झाले आहे. वारंवार चर्चा करूनही चीन आपला कुरापतखोर स्वभाव सोडत नसल्याने भारताने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार एखाद्या वस्तूवर निर्बंध घातल्यानंतर तो माल आयात करणार्याला परदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) चा परवाना घ्यावा लागेल. डीजीएफटी हे वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भारतात सर्वाधिक टीव्ही सेट्स हे चीनमधून आयात केले जातात.
नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चीनच्या आक्रमकतेला भारत सरकार ठोस उत्तर देत आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरही महत्त्वाचे निर्णय घेऊन चीनला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सरकारी खरेदीमतही चिनी कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या अर्थ चिनी कंपन्या केंद्र व राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या सरकारी खरेदीच्या बोलीमध्ये भाग घेता येणार नाही. एलएसीवरी तणावापूर्वीच एप्रिल महिन्यात भारताने भारताने थेट विदेशी गुंतवणुकी (एफडीआय) संबंधी नियम बदलले. करोनाच्या संकटाचा फायदा घेऊन चिनी कंपन्यांच्या ताब्यात भारतीय कंपन्या जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |