12:21pm | Mar 22, 2024 |
सुपौल : बिहारमधील सुपौल येथे कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली 20 हून अधिक लोक दबले असण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान भारतातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक प्रचंड संतापले आहेत. बकौर ते भेजादरम्यान पुलाचा गार्टर कोसळल्यानंतर अद्याप मदतकार्य सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासनाचे पथक पोहोचले आहे, परंतु हे मध्यभागी झाल्याने, पुरेशी उपकरणं घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मदत आणि बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.
सुपौल जिल्ह्यातील बकौर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब (10.2 किमी) महासेतूचं बांधकाम वेगाने सुरू आहे. हा महासेतू केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1199 कोटी 58 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे.
या पुलाचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र जे आता 2024 च्या अखेरीस पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत पुलाचं 56 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 171 पिलर असणार असून त्यापैकी 166 हून अधिक पिलर पूर्ण झाले आहेत. या पुलावर एकूण तीन किलोमीटरचा ॲप्रोच रोड तयार करण्यात येत आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |