07:37pm | Oct 25, 2022 |
वाई : साताऱ्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हुतात्मा पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांसोबत आपली दिवाळी साजरी केली.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून दिवाळीतच समीर शेख यांनी पदभार स्वीकारला. ते गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक होते. शेख यांनी यापूर्वी साताऱ्यात काम केलेले असल्याने व त्यांच्या कामाची ओळख असल्याने सातारकरांनी त्यांच्या नियुक्तीचे उत्साहात स्वागत केले आहे. त्यांनी गडचिरोली येथील लाहेरी पोलीस ठाण्यात ८ ऑक्टोबर २००९ रोजी नक्षलवाद्यांशी लढताना केलेल्या बॉम्बस्फोटात हुतात्मा झालेले धोम (ता वाई) येथील चंद्रशेखर देशमुख या पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांसोबत आपली दिवाळी साजरी केली. चंद्रशेखर देशमुख यांचे आई-वडील धोम येथे राहतात आपली शेती करतात. समीर शेख हे गडचिरोली येथे अधिकारी होते आणि ते आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक झाले आहे. गडचिरोली येथून सातारा आणि आता धोमला सपत्नीक घरी आल्याने हुतात्मा चंद्रशेखर देशमुख यांचे वडील संजय आणि आई सोयरा यांना खूप आनंद झाला. त्यांनी दु:खावेग बाजूला ठेवून शेख यांचे स्वागत केले. समीर शेख यांनी सपत्नीक देशमुख यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. किमान दीड तास त्यांच्यासोबत गप्पांमध्ये व्यतीत केला. दिवाळी भेट दिली. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर शेख यांनी वाईच्या गणपती मंदिरात महागणपतीचे दर्शन आणि आरतीही केली. वाई पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, अडचणी जाणून घेतल्या. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, स्नेहल सोमदे, सुधीर वाळुंज आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यानंतर समीर शेख यांनी भुईंज पोलीस ठाण्याला भेट दिली.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |