समाजकार्याची बांधिलकी ही रक्तात असावी लागते. समाजसेवेचे हे व्रत जपले शिक्षण मंडळाचे माजी सभापती राम हादगे यांनी पतीच्या या व्रतस्थ वाटचालीला खंबीर साथ दिली ती त्यांच्या पत्नी सीता हादगे यांनी. सातारा शहराच्या पाणी पुरवठ्याची संवेदनशील जवाबदारी सभापती खासदार उदयनराजे भोसले यांनी सीता हादगे यांच्या खांद्यावर विश्वासाने दिली. या विश्वासाला सार्थ उतरलेल्या सीता राम हादगे यांचा गुरुवारी १५ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त हा शब्दप्रपंच...
वॉर्ड क्रं १ मध्ये विकासाचा मोठा डोंगर उभा करणाऱ्या सीता हादगे व त्यांचे पती राम हादगे हे दाम्पत्य कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या वॉर्डला पोटच्या मुलाप्रमाणे जपते आहे. प्रभागात 2007 मध्ये बचत गटाची चळवळ उभी करणाऱ्या सीता हादगे यांनी शेकडो महिलांच्या हातांना काम दिले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक पती राम हादगे यांची सामाजिक बांधिलकी आदर्श पत्नीप्रमाणे सीता यांनी तंतोतंत अंगिकारली. दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालिका या नात्याने त्यांनी सहकार क्षेत्राचा अनुभव घेतला. वॉर्ड क्रं ३ मध्ये पार्किंग, बंदिस्त गटारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सुशोभिकरण, तोफखाना येथील वीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक सुशोभिकरण, पारंगे चौक विस्तारिकरण इ कामे मार्गी लावली. समाजकल्याण सभापती असताना मागासवर्गीय समाजातील गरजू मुलांसाठी त्यांनी गणवेश वाटप करून त्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर केली. 2016 पासून ते आजतागायत प्रभाग क्रमांक एकमध्ये विकासाचे नवीन मॉडेल उभे राहिले. रविवार पेठेत सुसज्ज मल्टीपर्पज हॉल व अभ्यासिका, हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण, 7लाखाची ओपन जीम, 3 लाख रुपयांची लहान मुलांसाठी खेळणी मागासवर्गीय वस्तीत 15 लाखाचे सुलभ शौचालय, मागासवर्गीय समाजातील जोडप्यांसाठी भाड्यांचा सेट इं विकास कामे त्यांनी केली . पाणी पुरवठा सभापती या नात्याने सकाळी शहराच्या कानाकोपऱ्यात तत्काळ पोहचणाऱ्या त्या एकमेव महिला सभापती आहे. नळ कनेक्शनची नियमितता हा त्यांचा कटाक्ष आहे. सांबरवाडी, व जकातवाडी या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांच्या अद्ययावतीकरणाचा महत्वाकांक्षी प्रस्ताव सीता हादगे यांनी तयार करून तांत्रिक अंदाजपत्रकासाठी तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाठवला आहे.
सीता हादगे कोरोनाच्या पंधरा महिन्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंब, वॉर्ड आणि सातारा शहराच्या पाणी पुरवठयासाठी सातत्याने दक्ष आहेत. सर्व वॉर्ड सॅनिटाईज करताना त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम केले. राम हादगे व सीता हादगे या आदर्श दाम्पत्याने समाजकार्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |