12:47pm | Mar 23, 2024 |
नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारतीय हद्दीतील एका व्यापारी जहाजाला बंदी बनवलेल्या सोमालियाच्या ३५ समुद्री चाच्यांना भारतीय नौदलानं कोंडीत पकडलं होतं. तसेच त्यांना समर्पण करण्यासाठी भाग पाडलं होतं. या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज नौदलानं त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, सीमा शुल्क आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३५ सोमालिया समुद्री चाच्यांना नौदलानं मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. १६ मार्च रोजी नौदलानं हे अँटी पायरसी ऑपरेशन केलं होतं.
नौदलाच्या INS कोलकातानं या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतलं होतं. या सर्व चाच्यांना मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आणण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांचा ताबा मुंबई पोलिसांकडं देण्यात आला.
नौदलाची मोहिम काय होती?
भारतीय नौदलानं भारतीय समुद्र किनाऱ्यापासून १४०० नॉटिकल माईलवर असलेल्या एका व्यापारी जहाजावर कब्जा करणाऱ्या ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना आत्मसमर्पणाशिवाय कुठलाही पर्याय ठेवला नव्हता. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी या जहाजावरील १७ चालक दलाच्या सदस्यांची सुखरुप सुटका केली होती.
नौदलानं आपल्या पी-८१ कोस्टगार्ड विमान, फ्रन्टलाईन जहाज, आयएनएस कोलाकात आणि आयएनएस सुभद्रा आणि मानवरहित विमान तैनात केलं होतं. या मोहिमेसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोंना जहाजावर उतरवण्यात आलं होतं.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |