उन्हाळा सुरु असून, बऱ्याच भागात तपामानाचा पार चाळीशी पार गेला आहे. कडक उन्हात आरोग्य आणि त्वचेची काळजी घेण्यासोबत डोळ्यांचीही घ्यायला हवी. खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांना उन्हाचा सर्वाधिक त्रास होतो. सूर्यप्रकाशात शेतात काम करणाऱ्या लोकांसाठी डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. शिवाय शहरात राहणाऱ्यांनीही डोळ्यांची तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे.
डोळ्यांच्या काळजी घेण्याबाबत आय-क्यू सुपर स्पेशालिटीचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. अजय शर्मा सांगतात, 'तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांच्या टिश्यूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे 'फोटोकेरायटिस' आणि 'पेटेरिजियम' होऊ शकते. म्हणजेच पृष्ठभागावर गाठसारखी समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय डोळ्यांना इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो'
उन्हाळ्यात तुमचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी 8 टिप्स :
a) उन्हात बाहेर जाणं होतंच. अशावेळी त्वचा आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाचं बाहेर जाताना, टोपी आणि सनग्लासेस घालायला विसरू नका.
b) धुळीच्या ठिकाणी काम करताना चष्मा घाला. यामुळे डोळ्यांच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो. शिवाय डोळ्यांना जळजळ होत नाही.
b) उन्हाळ्यात डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. जर डोळ्यांना कोणताही त्रास असेल तर, लवकर कळून येईल, व त्यावर उपचार घेणे सोपे होईल.
c) प्रखर सूर्यप्रकाश आणि धुळीचा सामना करण्यासाठी आपण चष्मा घालतोच, पण नियमित डोळे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. दिवसातून एकदा डोळे स्वच्छ धुवा.
d) उन्हामुळे डोळे चुरचुरत असतील किंवा लाल होत असतील तर, डोळ्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, आयड्रॉप्सचा वापर करा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल.
e) उन्हाळ्याच्या दिवसांत एकूणच हवेतील तापमानामुळे शरीर आणि डोळेही कोरडे पडतात. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे, पाणीदार फळे खाणे, सरबत, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करा.
f) आपण सतत उन्हात असो किंवा स्क्रीनवर काम, ठराविक वेळाने डोळ्यांचे व्यायाम करत राहा. डोळ्यांची उघड़झाप करणे, डोळे पाण्याने धुणे असे उपाय करावेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
g) उन्हाळ्यात डोळे येणे, डोळ्यांतून घाण येणे, डोळे चिकटणे, यासह इतर समस्या निर्माण होतात. अशावेळी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |