09:40pm | Mar 25, 2024 |
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा शहरातील करंजेपेठ येथील समर्थ भांडी दुकानाचा पत्रा उचकटून १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी २३ मार्च रोजी चोरून नेल्या होत्या. याबाबतची फिर्याद शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिला होता.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखाली तपास पथक तयार करण्यात आले होते. सदरची घरफोडी ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे (रा. कोंडवे, ता. जि.सातारा), ओंकार संदीप थोरात (रा. मोळाचा ओढा, सातारा) आणि रोहन विलास थोरात (रा. मतकर कॉलनी, सातारा) यांनी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी संशयितांना ताब्यात घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने संशयितांना मोळाचा ओढा येथून ताब्यात घेवून अटक केली. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेला मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अमित माने, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, अजय जाधव, अमित झेंडे, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, सचिन ससाणे, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी केली आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |