नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानेनिवडणूक रोखे प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता एसबीआय ला 12 मार्च रोजी कामकाजाचे तास संपेपर्यंत निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करावे लागणार आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली.
राहुल गांधींनी सोमवारी (11 मार्च, 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टद्वारे भाजपवर निशाणा साधला. "नरेंद्र मोदींच्या दान व्यवसायाची पोलखोल होणार! स्विस बँकेतील काळा पैसा 100 दिवसांत परत आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार स्वत:च्या बँकेची आकडेवारी लपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात खाली डोके वर पाय करत आहे."
"इलेक्टोरल बॉण्ड्स, हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार आहे. यामुळे भ्रष्ट उद्योगपती आणि सरकारचा संबंध उघड होईल आणि नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर येईल. क्रोनोलॉजी स्पष्ट आहे- देणगी द्या, व्यवसाय घ्या, देणगी द्या, संरक्षण घ्या! देणगी देणाऱ्यांवर आशीर्वादाचा वर्षाव आणि सामान्य जनतेवर कराचा बोजा, हे भाजपचे मोदी सरकार आहे," अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.
एसबीआय ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका :
स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी एसबीआय ची याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळली आणि बँकेला कडक ताकीदही दिली आहे.
26 दिवसांत कोणती पावले उचलली?
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने एसबीआयला विचारले की, "तुम्ही 26 दिवसांत काय पावले उचलली? तुमच्या अर्जात याबाबत काहीही नमूद केलेले नाही." यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय ला 12 मार्च 2024 रोजी कामाचे तास संपेपर्यंत निवडणूक आयोगाला (EC) निवडणूक रोख्यांशी संबंधित माहिती पुरवण्याचे आदेश दिले.
...तरअवमानाचा गुन्हा दाखल केला जाईल - CJI चंद्रचूड
CJI डीवाय चंद्रचूड यांनीही बँकेला इशारा दिला आणि म्हणाले - आम्ही SBI ची याचिका फेटाळत आहोत. 12 मार्चपर्यंत उपलब्ध डेटा उपलब्ध करुन द्या. निवडणूक आयोगाने देखील हा 15 मार्च 2024 पर्यंत प्रकाशित करावा. सध्या आम्ही एसबीआय विरुद्ध अवमानाची कारवाई करत नाही, पण आमच्या आदेशाचे पालन न केल्यास अवमानाची कारवाई केली जाईल.
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |