नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आता १०० रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. दोन हजार, ५००, २००, ५० आणि १० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर १०० रुपयांची नोट चलनात येईल. ही नोट जांभळ्या रंगात असणार आहे. यावर जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या गुजरातमधील ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे चित्र असणार आहे.
नवी १०० रुपयांची नोट चलनात आल्यानंतर जुनी नोट चलनात राहणार आहे. नव्या नोटेचे डिझाईन म्हैसूरमधील मुद्रणालयात पाठवण्यात आले आहे. याच ठिकाणी दोन हजार रुपयांच्या नोटांची छापाई करण्यात आली होती.
सध्याच्या १०० रुपयांच्या नोटेपेक्षा नवी नोट लहान असणार आहे. तर १० रुपयांच्या नोटेपेक्षा मोठी असणार आहे. ही नोट ऑगस्टच्या शेवटी बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
नोटाबंदी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून सुरुवातीला दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर १०, ५०, २००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता १०० रुपयांचीही नवी नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |