तिरुवअनंतपुरम : पूरस्थितीमुळे नऊ ऑगस्टपासून 67 जणांचा मृत्यू झाला आहे, तर यातील 25 मृत्यू एकाच दिवसात झाले आहेत. तर दुसरीकडे कोचीन विमानतळात पाणी भरल्यामुळे सेवा रद्द करण्यात आली आहे.
केरळच्या 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे, असा विश्वास मोदींनी दिला.
कोचीन विमानतळ शनिवारपर्यंत बंद राहणार
मुसळधार पावसामुळे केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच 39 पैकी 35 धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. पुरामुळे कोचीन विमानतळ शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या विमानतळावर अक्षरशः पूरस्थिती पाहायला मिळाली.
कोची विमानतळालगत असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आलं. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून एकही विमान उड्डाण करणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा चालू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन प्रशासनाने सांगितलं. पण पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्याने शनिवारपर्यंत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण राज्यात बचाव मोहिम सुरु असून लोकांना मदत छावण्यांमध्ये पोहोचवलं जात आहे. सरकारने एर्नाकुलममधील पेरीयार नदी, इडुक्की आणि थ्रिसूर येथे राहणाऱ्या लोकांना मदत छावण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |