RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

त्राहीमामऽऽऽ त्राहीमामऽऽऽ महाराज, बाबा.. त्राहीमामऽऽऽ

08 September 2019 at 16:28

पोलिसांपासून वाचविण्यासाठी झंवर अँण्ड गँगचा 'मिच्छामी दुक्कड्डम'

सातारा : सातार्‍यातील उद्योजक व भूमाफिया सुनिल झंवर याला सातारा पोलिसांनी मोक्का गुन्ह्याखाली अटक केल्यानंतर सातार्‍यातील बांधकाम तसेच उद्योगक्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. झंवर अँण्ड गँगच्या अनेक भानगडी सातारकरांना माहित होत्या. परंतू झाकली मुठ सव्वा लाखाची, अन् ह्यंच्या नादाला कुणी लागायचे, असे म्हणत अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतू सातारा टुडे च्या दणक्यानंतर अनेकांनी फोन करुन व प्रत्यक्ष भेटून सातारा टुडे कडे आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. यानिमित्ताने झंवर अँण्ड गँगच्या अनेक भानगडी सातारा टुडे च्या हाती लागलेल्या आहेत. परंतू पोलिसांचा ससेमिरा व कारवाई टाळण्यासाठी झंवर ऍण्ड गँगने त्राहीमामऽऽऽ त्राहीमामऽऽऽ महाराज, बाबा त्राहीमामऽऽऽ असे म्हणत आपल्या राजकीय गॉड फादर ‘अलियास’ भागिदारांना साकडे घालायला सुरुवात केली आहे. परंतू निवडणुका तोंडावर आल्याने या गॉड फादरांनाही 'तुमचे तुम्ही निस्तरा', असे म्हणत हात झटकल्यामुळे या गँगचा पाय अधिक खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुसेगाव, ता. खटाव येथील राजकुमार जाधव यांना जिवे मारण्याची धमकी देवून 16 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी झंवर अँण्ड गँगचा मुकूटमणी सुनिल झंवर याला परवा मोक्का अंतर्गत कारवाई करुन अटक केलेली आहे. झंवरच्या अनेक भानगडी यापूर्वी उघड झालेल्या आहेत. अनेक वर्षे सातारकरांना भेसळयुक्त अन्नपदार्थांचा पुरवठा करुन झंवरने कोट्यवधींची माया कमवली. परंतू ऐन दिवाळीत सातार्‍यातील अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी आरळे येथील लक्ष्मी नारायण मिलवर कारवाई करत लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल ताब्यात घेतला होता. परंतू हे कांडही सुनिल झंवरने पैशाच्या जोरावर जिरवले होते. परंतू पैशाची आणि स्थावर मालमत्ता गिळंकृत करण्याची सवय लागलेल्या झंवरने सातार्‍यात घार्गे, भंडारी, ठक्कर व इतर तालेवारांना सोबत घेवून सातार्‍यात भूमाफिया गँग बनवली. गेल्या दीड दशकाच्या कालावधीत या गँगने सातारा जिल्ह्यातील व शहरातील मोक्याच्या जागा बळकावून शेकडो एकर जमीन गिळंकृत केली आहे. या गँगला सातार्‍यातील राजकीय पुढार्‍यांनी भागिदारी तसेच आर्थिक आमिषापोटी पाठबळ दिल्याने ही गँग भलतील शेफारली. त्यात या गँगमधील एकजण आमदार झाल्यामुळे या गँगने मिळेल तसे आडवे-उभे हाणायला सुरुवात केली. बर, ह्यांचे कनेक्शन सातार्‍यापासून थेट बारामतीच्या दादापर्यंत असल्यामुळे ह्यंच्या नादाला सातार्‍यातील एकही माई चा लाल लागू शकला नाही. जो लागला, त्याला ह्यंनी मुळापासून उपटून फेकले. त्यामुळे त्यांची जी दहशत तयार झाली, ती आतापर्यंत होती. परंतू जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी झंवर ऍण्ड गँगला आपला 'नगरी' हिसका दाखवल्यामुळे या गँगची दोन दिवसांपासून तंतरलेली आहे. आपली कातडी वाचविण्यासाठी सातारच्या महाराजांपासून थेट 'वर्षा' बंगल्यापर्यंत फिल्डिंग लावली गेली आहे. परंतू कुठेच डाळ शिजत नसल्यामुळे आता 'मिच्छामी दुक्कड्डम' म्हणण्याची वेळ या गँगवर आलेली आहे. काल 'सातारा टुडे'ने फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचा व्यवहार फलटण नरेशांनी झंवर अँण्ड गँगला हाताशी धरुन कशापद्धतीने जिरवला, याचा लेखाजोखा मांडला होता. तो अनेकांना भावला. तर काही लोकांचा राग मस्तकात गेला. ह्यंना लाथा घालून तुडवले पाहिजे, अशा भावनाही काहींनी सातारा टुडे कडे व्यक्त केल्या. परंतू आता यांना लाथा घालून चालणार नाही. ज्यांच्या ज्यांच्या स्थावर मिळकती ह्यांनी गिळंकृत केल्या आहेत, अशा मिळकती न्यायालयीन मार्गाने सोडवल्या पाहिजेत. तरच सुनिल झंवर अँण्ड गँग पीडितांना न्याय मिळणार आहे. सुनिल झंवर याला परवा अटक झाल्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. राजशिष्टाराप्रमाणे पोलिसांनी त्याला सातारा येथील शासकीय रुग्णालयातील 'प्रिझन' वॉर्डमध्ये ठेवले आहे. झंवर याला रुग्णालयातून कधी सोडणार, याची विचारणाही पुणे येथील मोक्का न्यायालयाने केली आहे. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतरच त्याची रवानगी सुनिल झंवरचा खास यार व सध्या मोक्का कारवाईखाली येरवडा कारागृहात असणार्‍या गुंड दत्ता जाधवच्या कोठडीत होणार आहे. या गुन्ह्यातील दत्तात्रय रामचंद्र जाधव, खली उर्फ कृष्णा हणमंत बडेकर, विजय उर्फ भेजा भालचंद्र वाघमारे, प्रदीप धोंडिराम घाडगे यांना यापूर्वीच अटक होवून तेही येरवड्यात आहेत. मात्र गेल्या काही वर्षात सुनिल झंवरने पैशाच्या व राजकीय कनेक्शनच्या जोरावर आपली अटक टाळली होती. परंतू देर आये लेकीन दुरुस्त आये, असे म्हणत सातारा पोलिसांनी झंवरला अटक करुन सामान्य लोकांच्या कायद्यावरील विश्‍वासाला बळकटी देण्याचे काम केले आहे. मात्र यातील संशयित माजी आमदार प्रभाकर घार्गे, बाळू उर्फ जयंत ठक्कर, जावलीतील राजकीय नेते तथा माजी पंचायत समिती सभापती हभप. सुहास गिरी महाराज यांच्या चौकशीबाबत मात्र सस्पेन्स निर्माण झाला आहे. सातारा पोलीसही याबाबत सावध प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. मात्र, एका हाताने टाळी कधीच वाजत नाही, असा सिद्धांत आहे. सुनिल झंवरच्या पापाचे वाटेकरी अनेकजण आहेत. मात्र, या वाटेकर्‍यांना वाचविण्याचे काम सध्या जोमात सुरु आहे. याच्या पाठिमागे कोण आहे, हे आता सूर्यप्रकाशाइतके नितळ झाले आहे. सातारा टुडे कडे झंवर अँण्ड गँगच्या अनेक भानगडी येत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या सर्व भानगडींचा लेखाजोखा सातारा टुडे च्या माध्यमातून प्रकाशित केला जाईलच. तुर्तास झंवर ऍण्ड गँगच्या 'मिच्छामी दुक्कड्डम'ला शुभेच्छा!

- संग्राम निकाळजे.


बरोबर
सही


'मिशन आडवा आणि जिरवा' 20 वर्षांनंतर फत्ते

महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणात शरद पवार हे न उलगडलेलं कोडं होतं आणि आहे. परंतू कोणत्याही गोष्टीला ओहोटीही असतेच! पवारांची मोडस ओपरेंडी आजपर्यंत कोणालाही समजली नाही.

16 September 2019 at 04:08