07:47pm | Apr 26, 2018 |
तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वासराव पांढरे यांनी सातारा तालुका हद्दीत येणार्या म्हसवे गावामध्ये पुण्यातील नामचीन गुन्हेगार व दरोडेखोर डी. डी. सिंगचा उसाच्या शेतात घुसून 9 एमएम पिस्तुलातून गोळ्या घालून एन्काऊंटर केला होता. सातारा पोलीस दलाच्या इतिहासात ज्ञात असलेला हा एकमेव एन्काऊंटर म्हणावा लागेल. त्यानंतर सातारा पोलिसांच्या बंदुका कधीही धडाडल्या नाहीत. डी. डी. सिंगचा एन्काऊंटर झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य दिले होते. या काळात मुंबईमध्ये प्रदीप शर्मा, दया नायक, प्रफुल्ल भोसले, रविद्र आंग्रे, सचिन वाजे, विजय साळस्कर, राजेंद्र जोशी या अधिकार्यांनी सुमारे 1200 गुंडांना यमसदनी धाडले होते. पर्यायाने मुंबईमधील संघटित गुन्हेगारी मोडकळीस आली होती. त्याचा फायदा आज मुंबईला होत आहे. एकेकाळी मुंबईचे रस्ते रोजच रक्ताने माखले जायचे. परंतू या अधिकार्यांनी आपली शस्त्रे वेळीच परजली व मुंबईमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढली. त्याच धर्तीवर आज सातारा पोलिसांना पुन्हा एकदा आपली शस्त्रे परजावी लागणार आहेत. मुंबईच्या गुन्हेगारांसमोर दत्ता जाधव हा अगदीच नगण्य आहे. त्याची नांगी ठेचण्यासाठी सातारा पोलिसांना लाठीकाठी सोडून आता बंदुका तेलपाणी करुन परजाव्या लागणार आहेत. काल झालेल्या घटनेचा बोध घेवून सातारा पोलिसांच्या बंदुका धडाडणार असतील तर सातारकरांना आनंदच आहे. डी. डी. सिंगच्या एन्काऊंटरनंतर सातारा पोलिसांच्या खात्यात अजून एक एन्काऊंटर जमा करायचे असेल तर "उठ पोलिसा, जागा हो सातार्याच्या शांततेचा एक धागा हो", असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |