01:37pm | Oct 20, 2022 |
पंजाब : बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याने घेतलेल्या ऑनलाईन सत्संगात हरयाणाच्या भाजप नेत्यांनी हजेरी लावल्याचं वृत्त आहे. या सत्संगात ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी देखील हजेरी लावली असून त्याचे आशीर्वाद घेतले आहेत.
बलात्काराच्या गुन्ह्याखाली बाबा राम रहीम हा हा सध्या 40 दिवसांच्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. 18 ऑक्टोबर रोजी राम रहीम याने उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये एका ऑनलाईन सत्संगाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात हरयाणा भाजपचे मोठमोठे नेते हजर होते. यात करनाच्या भाजपच्या महापौर रेणु बाला देखील होत्या. त्यांनी राम रहीम याला पिताजी म्हणून संबोधित केलं. रेणु बाला यांच्या खेरीज भाजप जिल्हा अध्यक्ष योगेंद्र राणा, उप महापौर नवीन कुमार आणि वरिष्ठ उप महापौर राजेश कुमार यांनीही या सत्संगाला हजेरी लावली होती.
या सत्संगाची चर्चा होण्याचं मुख्य कारण हरयाणात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका हे आहे. या पार्श्वभूमीवर बाबा राम रहीम याचं पॅरोलवर बाहेर येणं चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण, यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकांवेळी देखील त्याला पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा जून महिन्यात तो 30 दिवसांच्या पॅरोलवर होता.
गेल्या पाच वर्षांपासून साध्वी बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्ये प्रकरणात राम रहीम हा शिक्षा भोगत आहे. त्याच्या शिक्षेच्या कालावधी पूर्ण होण्यास अजून बराच अवधी आहे. मात्र, अवघ्या पाच वर्षात तो पाचपेक्षा अधिक वेळा कधी फर्लो तर कधी पॅरोलवर बाहेर पडत असल्याने निवडणुकांमागे त्याच्या समर्थकांचा प्रभाव हे कारण असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र या गोष्टीचं खंडन केलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा या सत्संगाशी काहीही संबंध नसल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. तसंच, कैद्याने पॅरोलवर बाहेर येणं ही देखील सामान्य प्रक्रिया असल्याचं समर्थन भाजप नेते करत आहेत.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |