12:24pm | Oct 06, 2020 |
जिनिव्हा: जगभरात कोरोना महामारी थांबण्याचे नाव घेत नसतानाच जागतिक आरोग्य संघटनेने काळजी वाढविणारा इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार जगातील प्रत्येक 10 व्यक्तींमागे एकाला करोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे आता जगातील बहुसंख्य लोक करोनाच्या विळख्यात अडकणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, जगभरातील 10 टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास 76 कोटीजणांना करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. करोनाबाधितांची संख्या जेवढी नोंदणीकृत झाली आहे, त्यापेक्षाही अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे अनेक तज्ञांनी सांगितले आहे.
जागतिक करोनाच्या संसर्गाच्या मुद्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारणी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. मायकल रायन यांनी हा इशारा दिला. जगातील मोठी लोकसंख्येला करोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितले की, करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार आहे. मात्र, संसर्ग कमी करण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास यश आले असून येणार्या दिवसांत अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. दक्षिण-पूर्व आशिया भागात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर, युरोप आणि पूर्व भूमध्य सागराजवळील प्रदेशात बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिक भागातील स्थिती अधिक चांगली होती, असेही त्यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |