02:27pm | Apr 01, 2021 |
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोठी घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्रातील कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आलाय.
यावेळी अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. ही माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. एकामागोमाग एक अनेक ट्विट करत महाराष्ट्रासाठी आनंदाची बरसातच केली. खास करुन कोकणावासियांसाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचं चित्र दिसत आहे. नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी 11 ते सव्वा अकरादरम्यान केलेल्या वेगवेगळ्या ट्विटमध्ये प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग 166 ई वरील गुहार चिपळूणला जोडणार्या रस्त्याचं काम करण्यासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं गडकरी यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
चिपळूणच नाही तर जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणाही गडकरींनी ट्विटरवरुन केली. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे.
गडचिरोली तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग 353 सीवरील 262 किमी ते 321 किमीच्या अंतरामध्ये 16 लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय.
राष्ट्रीय महामार्ग 752 आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी 228 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे.
तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 753 च्या दोन पदरी रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.
तारीरी- गगनबावडा - कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग 166 जीवरील रस्त्याच्या कामासाठी 167 कोटी रुपये देण्यात येत असल्याचं गडकरींनी सांगितलं आहे.
तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी 288.13 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत 28.2 किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.
नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उढ्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एखूण 478 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय.
नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असेल.
आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 543 साठी 239 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.
राष्ट्रीय महामार्ग 361 एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
गडकरी यांनी जाहीर केलेल्या या सर्व कामांपैकी सर्वच कामं ही महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे या माध्यमातून राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होईल असं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |