12:17pm | May 11, 2020 |
करोना व्हायरस विरोधातील लढ्यामध्ये भारताने अजून एक यश मिळवले आहे. भारताने कोविड१९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (NIV) पहिली स्वदेशी करोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.”पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड१९ अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात करोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल”, असे ते म्हणाले. अडीच तासांमध्ये ९० चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय, कोविड-१९ (कोरोना) विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत. आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ही संस्था असून तिच्या सहकार्याने ही लस विकसित केली जाणार आहे. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी ललामभूत ठरणारे कार्य असेल. या संशोधनासाठी प्राण्यांवर तसेच पुढील टप्प्यांत माणसांवर प्रयोग करावे लागतील. त्याबद्दलच्या परवानग्या वेळेत मिळण्यासाठी आयसीएमआर बीबीआयएलला मदत करेल. लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक देश प्रयत्नशील आहेत. अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देशांचा यात समावेश आहे. त्यामध्ये एनआयव्ही-बीबीआयएच्या संयुक्त संशोधन प्रकल्पामुळे आता भारतही या देशांत सामील झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |