04:42pm | Sep 16, 2022 |
दिल्ली : चायनीज लोन ॲप्सप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ED ने Paytm, Easebuzz, Razorpay आणि Cashfree ची बँक आणि व्हर्चुअल खात्यांमधील 46.67 कोटी रुपये गोठवले आहेत. चायनीज लोन अॅप प्रकरणात काही दिवसांपूर्वीच ईडीने या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.
या कंपन्यांवर छापे
14 सप्टेंबर रोजी ईडीने दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबई आणि बिहारमधील गयासह सहा ठिकाणी छापे टाकले होते. याशिवाय, एचपीझेड लोन अॅपवर नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरू येथील PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree या पेमेंट कंपन्यांच्या 16 ठिकाणी छापे टाकले.
Easebuzz खात्यांमध्ये 33.36 कोटी रुपये सापडले
या कंपन्यांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आल्याचे ईडीला तपासादरम्यान समजले. EasyBuzz Pvt Ltd (Pune) च्या खात्यात 33.36 कोटी रुपये, Razorpay Software Pvt Ltd च्या खात्यात 8.21 कोटी रुपये, Cashfree Payments India Pvt Ltd च्या खात्यात 1.28 कोटी रुपये आणि Paytm च्या खात्यात 1.11 कोटी रुपये सापडले आहेत. ईडीच्या निवेदनानुसार, या विविध बँक खाती आणि आभासी खातींमधील सुमारे 46.67 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली. नागालँड पोलिसांनी गेल्या वर्षी नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
HPZ टोकन ही ॲप्स आधारित कंपनी आहे, ज्याने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली युजर्सना अधिक फायदे देण्याचे वचन दिले होते. सुरुवातीला युजर्सना HPZ टोकन F ने कंपनीत गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक दुप्पट करण्याचे आमिष दाखवले हेत्. युजर्सकडून पेमेंट UPI आणि इतर पेमेंट गेटवेद्वारे गोळा केली. सुरुवातीला काही अंशी रक्कमही गुंतवणूकदारांना देण्यात आली. शिल्लक रक्कम विविध पेमेंट गेटवे आणि बँकांद्वारे विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला रेझरपे प्रायव्हेट लिमिटेड, कॅशफ्री पेमेंट्स, पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि चिनी व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांची झडती घेतली होती. तपासादरम्यान ते बनावट पत्त्याच्या आधारे काम करत असल्याचे आढळून आले. चिनी व्यक्तींच्या नियंत्रणाखाली असलेल्या व्यापारी आयडी आणि बँक खात्यांमधून 17 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |