08:05pm | May 02, 2021 |
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीने गड राखला असून तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम विधानसभेत पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांना भाजपाच्या शुभेंदु अधिकारी यांनी पराभूत केलं आहे. शेवटच्या फेरीपर्यंत या दोघांमध्ये चुरस रंगली होती. मात्र शेवटच्या फेरीत फासे उलटे पडले आणि ममता दीदींचा पराभव झाला. त्यामुळे सत्ता आली तरी ममता दीदींना पराभवाची सळ राहणार आहे. पराभवाचा निकाल येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांत त्यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच केंद्र सरकार आणि भाजपावर हल्लाबोल केला.
‘केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नानंतरही आपला विजय झाला आहे. हा बंगाल आहे आणि बंगालमधील जनतेचा विजय आहे. बंगालच्या जनतेने देश वाचवला आहे. मी सांगितलं होतं आम्ही द्विशतक ठोकू. या विजयामुळे बंगालमधील जनता वाचली आहे. आम्ही सांगितलं होतं खेलो हौबे आणि शेवटी विजय आपलाच झाला’ असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
‘नंदीग्राममधील पराभव मी स्वीकारला आहे. नंदीग्राममध्ये काय झालं विसरून जा. आमच्या पक्षानं बहुमतांना निवडणूक जिंकली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार’, असं त्यांनी सांगितलं.
करोना संकट पाहता ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना विजयी जल्लोष न करण्याची विनंती केली आहे. तसेच ग्रामीण बंगालमधील फुटबॉल क्लबना ५० हजार फुटबॉल वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता दीदींच्या पायावरील प्लास्टर काढण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच शांततेत घरी जाण्याचं आवाहन केलं.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |