सातारा : डाळिंब त्याच्या चव आणि आश्चर्यकारक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. तर आपल्यापैकी बरेच जण त्याचे फायदे मिळवण्यासाठी आतील लाल लाल बिया खातात आणि त्याची कडक साल कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतात. पण तुम्हाला माहित आहे का की डाळिंबाच्या बियां प्रमाणेच त्याची सालही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. होय, ज्याप्रमाणे संत्र्याची साल तुमची सुंदरता वाढवण्यास मदत करते, त्याचप्रमाणे डाळिंबाची साल गाल आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगली असते. याव्यतिरिक्त स्त्रियांचा मासिक पाळी दरम्यान होणारा अति रक्तस्त्रावाचा त्रास कमी करण्याबरोबरच ते मूळव्याधाची समस्या सोडवण्यासाठी देखील चांगले ठरते.
याशिवाय डाळिंबाच्या सालाचे इतरही अनेक फायदे आहेत. पर्यावरणाशी जोडलेल्या ओरियन ग्रीनच्या संस्थापक नीता उपाध्याय यांनी दिलेल्या संदर्भासहित आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या सालीचे असे काही फायदे सांगणार आहोत ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. शिवाय या सालीच्या वापराने त्वचा, केस व इतर गोष्टींना कसा लाभ मिळवून देऊ शकतो हेही सांगणार आहोत.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून म्हातारपणाच्या खुणा मिटवतं
डाळिंबाची साले आपल्या त्वचेतील कोलेजनचे प्रमाण नष्ट होण्यापासून रोखतात आणि पेशींच्या वाढीस उत्तेजन देतात, जे वृद्धत्वाची चिन्हे आणि सुरकुत्या प्रभावीपणे कमी करण्यास मदत करतात. सुरकुत्या आणि वृद्धत्वाची इतर चिन्हे टाळण्यासाठी येथे 10 टिप्स दिल्या आहेत. यासोबतच त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या जसे की मुरुम व पुरळ देखील यामुळे बरे होऊ शकतात.
कसा करावा वापर : उन्हात वाळवलेल्या आणि बारीक केलेल्या डाळिंबाच्या सालीची पावडर दोन चमचे घ्या आणि त्यात थोडेसे दूध घाला. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दुधा ऐवजी गुलाब पाणी पावडर मध्ये मिक्स करुन पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि ती सुकेपर्यंत तशीच राहुद्यात. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या आणि चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोनदा ही पावडर किंवा पेस्ट चेह-यावर लावा.
डाळिंबाची साल आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते. ती आपल्या त्वचेला प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय विषारी घटकां पासून वाचवते. तसेच त्वचेचे पीएच लेवल योग्य ठेवते. फळाच्या सालीमध्ये असलेले एलाजिक अॅसिड त्वचेतील ओलावा लॉक किंवा टिकवून ठेवते ज्यामुळे त्वचा मऊशार राहते.
कसा करावा वापर : सूर्यप्रकाशात वाळलेल्या डाळिंबाच्या साली मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर स्वच्छ बाउल मध्ये काढा. आठवडाभर चांगली राहिल इतकी पावडर बनवून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. दोन चमचे ही पावडर घ्या आणि त्यात थोडे दही घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहुद्यात. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
तोंडाच्या आरोग्यासाठी लाभदायक
डाळिंबाची साले अनेक दंत समस्यांपासून जसे की तोडांची दुर्गंधी, हिरड्यांना आलेली सूज आणि तोंडातील अल्सर किंवा छाले यापासून मुक्ती मिळवून देण्यास मदत करू शकतात. तोंडाच्या अल्सरवर देखील हे प्रभावी ठरतात. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.
कसा करावा वापर : एक ग्लास पाण्यात उन्हात वाळवून नंतर मिक्सरमध्ये वाटलेल्या डाळिंबाच्या सालीची एक चमचा पावडर घ्यावी आणि मिश्रण चांगले मिक्स करावे. त्यानंतर या पाण्याने गार्गल म्हणजेच गुळण्या करा.
हृदयाच्या आरोग्यासाठी आहे सर्वोत्तम
तज्ञांचे म्हणणे आहे की साली मध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे धोकादायक आणि जीवघेण्या हृदयरोगाशी लढण्यात मदत करतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते, तणाव कमी करते आणि हृदयाचे आरोग्य हेल्दी ठेवते. ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवतात.
कसा करावा वापर : डाळिंबाच्या सालीची पावडर एक चमचे कोमट पाण्यात मिसळून हे मिश्रण रोज प्याल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तथापि, रोज हे पेय प्यायल्याने आपल्याला योग्य आहार आणि नियमित व्यायामासह आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.
सनस्क्रिनसारखं काम करते ही पावडर
डाळिंबाच्या साली मध्ये सन ब्लॉकिंग घटक असतात जे आपली त्वचा हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून वाचवू शकतात जे त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी खूप मदत करु शकतात. नैसर्गिकरित्या सनटॅन पासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे काही घरगुती उपाय दिले आहेत.
कसा करावा वापर : उन्हात वाळवून डाळिंबाच्या सालांची पावडर बनवा आणि हवाबंद डब्यात साठवा. घराबाहेर पडण्याच्या 20 मिनिटे आधी ही पावडर तुमच्या लोशन किंवा क्रीम मध्ये मिसळा. वैकल्पिकरित्या जर तुम्हाला नैसर्गिक सनस्क्रीन वापरायचे असेल तर तुम्ही ही पावडर काही आवश्यक तेलांमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.
केसगळती व डॅंड्रफ होण्यापासून रोखतात
डाळिंबाच्या साली केस गळती आणि कोंडा होण्याचा धोका टाळण्यास मदत करू शकतात. डोक्यातील कोंडा नियंत्रित करण्यासाठी येथे सात घरगुती उपाय सांगितले आहेत.
कसा करावा वापर : वाळलेल्या डाळिंबाच्या सालीची पूड केसांच्या तेलात मिसळा. त्यानंतर ते केसांच्या मुळांशी लावा आणि चांगली मसाज करा. तुम्ही हे तेल लावल्यानंतर दोन तासांनी सौम्य शॅम्पूने केस धुवू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार रात्रभर तसेच ठेऊ शकता. अशाप्रकारे डाळिंबाच्या साली आपले संपूर्ण आरोग्य निरोगी राखण्यात मदत करतात.
मुलांची भूक वाढवण्यासाठी करतात मदत
जर तुमची लहान मुलं नीट जेवत नसतील तर डाळिंबाच्या सालीची पावडर घुटीत मिसळून तुम्ही त्यांची भूक वाढवू शकता. अनेक लोक अजूनही डाळिंबाच्या सालीच्या पावडरपासून बनवलेली घुटी वापरतात.
टीप - हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषध किंवा उपचाराला पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |