सातारा : कराड न्यायालयाने एकास पोक्सोंतर्गत वीस वर्षाच्या कारावासासह 35 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश बाळू माने वय 22, रा. चरेगाव, ता. कराड याने घटनेतील पीडीतेशी संबंध वाढवून त्याच्या राहत्या घरी ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तसेच घरच्यांना बदनाम करण्याची दमदाटी करून पीडीतेवर अत्याचार केला. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील यांनी करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते व दोषारोप पत्र दाखल केले होते.
हा खटला कराडच्या अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती होरे यांच्या न्यायालयात चालला होता. जिल्हा सरकारी वकील परमार यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार, पंचांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी आकाश बाळू माने यास वीस वर्षे कारावास व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
उंब्रज पोलिसांनी कसोशीने तपास करून, न्यायालयात योग्य दोषारोप पत्र दाखल करीत पुरावे योग्य पद्धतीने सादर केल्याने उंब्रज पोलिसांच्या लौकिकात भर पडली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, तत्कालीन प्रभारी अधिकारी अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला असून पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, प्रकाश कारवेकर यांनी या खटल्यामध्ये योग्य ती मदत केली.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |