कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपूर्वी सुरक्षितेतच्या कारणांवरून ३३ गँगस्टर राज्यातील अन्य कारागृहात काही काळापुरते स्थलांतरित केले असले तरी अनेक गुन्ह्याचे कनेक्शन कळंबा कारागृहातील गँगस्टर आणि त्यांचे चेले आहेत. तुरुंगाधिकारी, अधीक्षकांवर हल्ला करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे कळंबा प्रशासनाच्या यंत्रणेचा धाक कैद्यांवर राहिला नसल्याचे समोर आले आहेत.
कळंबा कारागृहात देशभरातील कैदी आहेत. त्यामध्ये बॉम्बस्फोट, गँगस्टर, मोका, खून असे गंभीर गुन्हे दाखल असलेले कैदी आहे. अनेक कुख्यात गुंड, विदेशी गुन्हेगार, मोक्कामधील आरोपी, राज्यभरात गाजलेल्या प्रकरणांतील नामचिन गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये मोक्कामधील २०३ कैदी असून ७ परदेशी कैदी आहेत. एकूण २२१२ कैदी आहेत. राज्यभरातील गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात बंदिस्त असतात. एकेकाळी मुंबई, पुणे, तळोजा, नागपूर पाठोपाठ कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या कारागृहाची सुरक्षा अव्वल दर्जाची मांडली जात होती. मात्र आता कळंबा कारागृहाची शिस्त बिघडली आहे.
कळंबा कारागृहात सातत्याने काही ना काही घडत असते. आता कारागृहात मोबाइलची टीप दिल्याच्या कारणावरून गुंडासह सुभेदाराला मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. जर्मनी टोळीच्या म्होरक्यासह १४ जणांनी केलेल्या मारहाणीत सुभेदार गंभीर जखमी झाला. जर्मनी टोळी, गजा मारणे टोळी, मुंबई, पुणे येथील मोक्कातील गंभीर गुन्हेगार कळंबा कारागृहात आहेत. कारागृहात राहून राज्यातील गुन्हेगारीचा कट येथूनच शिजत आहे. मोक्कातील गुन्हेगार हे बाहेर असलेल्या आपल्या टोळी प्रमुखांकडून खंडणी, खून करून घेत असल्याचे यापूर्वी झालेल्या पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या त्याचे स्थलांतर केले असले तरी त्यांचे चेले कारागृहात आहेत. त्यांच्याकडून गुन्हेगारी यंत्रणा सुरू आहे.
कारागृहातील मोबाइल प्रकरणाचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे. यात जिल्ह्यातील दोन टोळ्यांसह पुण्यातील एका टोळीचा तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. या टोळीशी काय कनेक्शन शोधण्याचे काम पथकाकडून सुरू असल्याचे समजते.
सुरक्षेच्या कारणामुळे कळंबा कारागृहातील ३३ गँगस्टार राज्यातील विदर्भातील कारागृहात तात्पुरते स्थलांतरित केले आहेत. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, पुणे, सातारा, इचलकरंजी येथील गँगस्टरचा समावेश आहे.
पहिल्यांदाच कारागृहात आलेले तरुण इथल्या अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात येतात. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर कारागृहात मिळालेले धडे गिरवतात. सांगलीतील खून प्रकरण, कोल्हापुरातील काही गुन्हे कळंबा कारागृहात शिजलेल्या कटातून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या घडल्या घटना :
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |