08:14pm | Apr 15, 2024 |
सातारा : देशात केंद्र सरकारचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे तो एककेंद्री प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडी महाराष्ट्रातील 48 जागा एकजूटपणाने लढवत आहे. त्यापैकी दोन तृतीयांश जागा इंडिया आघाडीला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. सातार्यात सुद्धा आमचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करणार्यांना आम्ही चोख उत्तर देणार आहोत. आमचे नाणे खणखणीत आहे. सातारा पुरोगामी विचारांचा असून येथे परिवर्तन घडणारच, अशी ठाम ग्वाही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी सातार्यात दिली.
येथील प्रीती एक्झिक्युटीव्ह हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार शशिकांत शिंदे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता पवार जिल्हा दौर्यावर होते. अर्ज भरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.
पवार म्हणाले, इंडिया आघाडीचे एक सूत्र आहे. महाराष्ट्रातील 48 जागा एकजूटपणाने लढून त्या मिळवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी दहा वर्षात काय केले असे सांगतात. मात्र गेल्या दहा वर्षात त्यांचीच सत्ता होती. त्यामुळे त्यांनीच सांगावे त्यांनी काय केले? 2004 ते 2014 या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर मी महाराष्ट्रासाठी काय केले, हे मात्र निश्चित सांगू शकतो.
अजितदादा गटाच्या बारामतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात घरातले आणि बाहेरचे असे वक्तव्य शरद पवारांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात नक्की काय विधान केले असा प्रश्न पवारांना विचारला असता ते म्हणाले, माझ्या या विधानाचा गैर अर्थ लावला जात आहे. आधी बारामतीत मी लढलो. नंतर अजित पवार लढले, त्यानंतर सुप्रिया सुळे लढल्या, आता ते सुनेत्रा पवारांसाठी मत मागत आहेत. या संदर्भाने मी बोललो होतो. त्यात कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही. महिला सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना घेतले होते. त्यामुळे गैरअर्थ काढणार्यांविषयी मी बोलू शकत नाही.
महाराष्ट्रामध्ये 48 पैकी महाविकास आघाडीच्या दोन तृतीयांश जागा निवडून येतील. महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे. आम्ही महाराष्ट्रात जिथे दौरा करतो तेथे मतदार राजा आम्हाला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रात परिवर्तन घडणार. तसेच सातारा जिल्ह्यातही आम्ही आमदार शशिकांत शिंदे हा उमेदवार दिला आहे. आज उमेदवारी अर्ज भरताना झालेले शक्तिप्रदर्शन ही परिवर्तनाची सुरुवात आहे. पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा नेहमीच परिवर्तनाला बळ देतो. जे चांगलं आहे त्यालाच प्राधान्य देतो. शशिकांत शिंदे हे आमचे नाणे खणखणीत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात दाखल आरोप करणारे नेमके आत्ताच आरोप का करतात हे समजत नाही. मात्र आमचे उमेदवार त्याला पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र उत्तर देतील, असे पवार यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांना महायुतीने अद्याप तिकीट जाहीर केलेले नाही. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, ते राजे आहेत आणि आम्ही प्रजा आहोत. राजांच्या अवस्थेबद्दल आम्ही काय बोलायचे, असे म्हणत पवारांनी उदयनराजेंना तिरकस टोला लगावला.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |