सातारा : कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड, कडेगाव, वाळवा, शिराळा, खटाव, माण, खानापुर तालुक्यातील रुग्णांसाठी संजीवनी ठरले आहे. त्यामुळे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र त्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही.
त्याचबरोबर त्यांना इतरही आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. रुग्णालयात सफाई कर्मचारीच नसल्याने तेथे मोठी गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी कचरा, धुळ साचत असुनही त्याची सफाई दररोज केली जात नसल्याने दुर्गंधीही परसत आहे. त्याचा फटका रुग्णांसह नातेवाईकांना बसत असुनही रुग्णालयाचे प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
रुग्णांसाठी पाणी, स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयात अनेकदा पाणीच मिळत नाही. त्यामुळे रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना विकत आणुन पाणी द्यावे लागत आहे.
येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे १३८ बेडचे मोठे रुग्णालय आहे. मात्र रुग्णांची संख्या शेकड्यात आणि बेड हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे उपलब्ध बेडपैकी सर्व बेड दररोज भरलेले असतात. त्यामुळे नव्या येणाऱ्या रुग्णांना अॅडमीट व्हायचे असेल तर लगेच बेड उपलब्ध होतेच असे नाही. त्यामुळे त्यांना सातारच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात मी स्वतः जावुन रुग्णांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे पाहिले आहे. त्यासारखे दुर्दैव नाही. त्याचबरोबर त्या परिसरात स्वच्छता ठेवली जात नाही. अनेक दिवस कचरा तसाच पडलेला असतो. रुग्णांना नीट उपचार मिळत नाहीत. उपजिल्हा रुग्णालय हे नावालच उरले आहे. त्याकडे आरोग्य विभागच्या वरिष्ठांनीच लक्ष द्यावे. अन्यथा लवकरच जनआंदोलन उभारणार आहोत. - प्रमोद पाटील नागरीक कराड
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |