सातारा : पाल, ता. कराड येथील यात्रेत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष अन् भंडाऱ्याची उधळण होत असतानाच दुसरीकडे मात्र, चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल तीन लाखांचे दागिने गायब करण्यात आले. ही घटना दि. २२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाच जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाल यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडोबा -म्हाळसा विवाह सोहळा पार पडत असतानाच भंडारा व खोबऱ्यांच्या तुकड्यांची उधळण केली जात होती. त्याचवेळी भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून त्यांचे दागिने लुटले जात होते.
खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा झाल्यानंतर चार भाविकांचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. संगीता राजन कांबळे (वय ५०, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले. अमर रंगराव पाटील (वय ३५, रा. आसगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. त्याचबरोबर आक्काताई शिवाजी भवर (रा. वेजेगाव, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्याही गळ्यातील ६८ हजार रुपये किमतीची साेन्याची मण्याची माळ तर सतीश आनंदराव माेरे (रा. किणी, ता. हातकणंगल, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २१ ग्रॅम ५०० मिली वजनाची सुमारे १ लाख १४ हजार ४८७ रुपयांची साेन्याची चेन हिसकावून नेली. अशा प्रकारे एकूण ६ तोळ्यांचे सुमारे ३ लाख २ हजार ४८७ रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले.
या प्रकारामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यांना तक्रार देणे शक्य होते. अशा भाविकांनी उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आणखी बऱ्याच लोकांचे दागिने चोरीस गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान :
पाल यात्रेत लाखो भाविकांची गर्दी लोटली होती. त्यातच भाविकांच्या अंगावर भंडारा असल्यामुळे चेहरे ओळखून येत नव्हते. त्यामुळे या यात्रेत दागिने चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर माेठे आव्हान असणार आहे.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |