08:25pm | Apr 15, 2024 |
सातारा : महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही आपल्या राजकारणाचा दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक सोमवारी पुन्हा एकदा पहायला मिळाली.
महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना पवार साहेबांनी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढवत नेला. महायुतीला गाफील ठेवत निर्णायक क्षणी शशिकांत शिंदे हा आपला हुकमी एक्का पुढे केला. सोमवारी राष्ट्रवादीच्या झालेल्या भव्यशक्ती प्रदर्शनाने पवारांच्या राजकारणाची चुणूक पाहायला मिळाली. त्यामुळे बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा पवारच किंग आहेत, हे सिद्ध झाले. लोकसभा उमेदवारी अर्ज आमदार शशिकांत शिंदे यांनी जरी भरला तरी महायुतीला धोबीपछाड देण्यासाठी थोरल्या पवारांनीच जणू शड्डू ठोकला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भल्या भल्यांच्या राजकारणाच्या सीमा जिथे संपतात तिथे पवारांचे राजकारण सुरू होते असे म्हटले जाते. सातारा व माढा या दोन मतदारसंघाचा राजकीय घोळ सुमारे महिनाभर सुरू होता. माढा मतदारसंघात महायुतीने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काहीच दिवसात फलटण व अकलूज येथून बंडखोरी उफाळून आली. तेथेही पवारांनी मोहिते घराण्याचे धैर्यशील मोहिते यांना आपल्या गळाला लावत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी प्रवेश करून घेतला. त्यावेळी झालेल्या जोरदार शक्ती प्रदर्शनातही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा मतदारसंघात जोरदार टक्कर मिळणार, असे चित्र तयार करण्यात पवार यशस्वी ठरले. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उत्तम जानकर यांना विशेष विमानाने सोबत घेऊन नागपूरला जावे लागले. सातार्यातही हाच ट्रेलर पवारांनी दाखवला.
महायुतीचा उमेदवार जाहीर न करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष पवारांच्या हालचालीकडे होते. पण पवारांनी सुद्धा आपले उमेदवारीचे पत्ते ओपन केले नाहीत. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी केवळ दहा जागा आपल्या पदरात घेत साहेबांनी सातार्याचा पत्ता उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी दोन दिवस आधी जाहीर केला. त्यामुळे महायुतीला सुद्धा आता उदयनराजे भोसले यांच्याशिवाय दुसरा तगडा उमेदवार नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे.
उदयनराजे भोसले यांनी तिकिटाशिवाय प्रचार सुरू ठेवला आहे आणि मीच रिंगणात असणार, असा राजकीय आवेशही त्यांचा कायम आहे. सोमवारी राष्ट्रवादीची सातार्यात जोरदार रॅली झाली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातला शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता पवारांचा आदेश मानून उत्साहाने सामील झाला. इंडिया आघाडीचे सर्व नेते झाडून या शक्ती प्रदर्शनाला उपस्थित राहिले. इंडिया आघाडीने लोकसभेची एक-एक जागा एकजुटीने लढून खेचून आणायची, असा चंग बांधलेला आहे. याची माहिती स्वतः पवारांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे महायुतीच्या चाणक्यांना जो मेसेज द्यायचा तो पवारांनी अत्यंत चाणाक्षपणे दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व माढा या मतदारसंघात महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र स्वतःच्या फायद्याची अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात पवार वाकबगार असून ते कधी महायुतीला धोबीपछाड देतील याचा नेम नसल्यामुळे महायुतीच्या नेत्यांना सुद्धा येथे प्रत्येक गोष्ट रणनीती आखूनच करावी लागत आहे. 2019 मध्ये पावसातील पवारांच्या सभेने महाराष्ट्रातील सत्तेचे गणित बिघडवले होते. पवारांनीच नंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आणली आणि सत्तेत अडीच वर्ष आपला वरचष्मा कायम ठेवला. आता जरी अजितदादा गट महायुतीमध्ये सहभागी झाला असला तरी पवारांनी नवीन चेहरे उभे करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राची अखंड यात्रा सुरू ठेवली आहे. पण सातारा व माढा या लोकसभा मतदारसंघांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. येथूनच परिवर्तनाची सुरुवात होईल, अशी त्यांना आशाही वाटते.
एकंदरीत पाहता महाविकास आघाडीच्या रॅलीचे प्रचंड स्वरूप बघितले तर पहिल्या टप्प्यात पवारांना यश आल्याचे जाणवत आहे. पवारांचा शब्द महाराष्ट्रात इंडिया आघाडीला किती जागा मिळून देतो, हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |