कराड : आम्ही या एरीयाचे भाई आहे, असे म्हणत भाजी विक्रेत्यांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा खंडणी मागण्यात आली. तसेच हप्ता द्यायला नकार दिल्याने युवकावर वार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत रमेश कारंडे (रा. चांभारगल्ली, गुरूवार पेठ, कराड), श्रीधर थोरवडे, बाळू कुर्ले (रा. कराड) यांच्यासह अन्य एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत श्रीकांत सुर्यकांत शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूवार पेठेत राहणारे श्रीकांत शिंदे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.
सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते गुरूवार पेठेत भाजी विक्री करीत असताना रोहीत कारंडे याच्यासह त्याचे अन्य साथीदार त्याठिकाणी आले. आम्ही या एरीयाचे भाई आहोत. आम्हाला हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दमदाटी केली. श्रीकांत यांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कोयता व चाकूने त्यांच्यावर वार केला. मात्र, श्रीकांत यांनी तो वार चुकवला. त्यावेळी इतर भाजी विक्रेते भीतीने भाजीपाला जागेवरच सोडून पळून गेले.
चाकू व कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी श्रीकांत शिंदे यांच्या खिशातील साडेआठशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच इतर विक्रेत्यांनाही हप्ता देण्यासाठी धमकावले. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |